encounter specialist pradeep sharma 
मुंबई

एनकाऊंटर्स ते राजकारण....!

अमित गोळवलकर

माध्यमे ज्यांचे वर्णन एकेकाळी 'बाँबेज् डर्टी हॅरी' असे करत असत ते मुंबईचे एनकाऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा राजीनामा देऊन राजकारणात प्रवेश करणार आहेत. त्यांना नालासोपाऱ्यातून शिवसेनेचे तिकिट मिळेल, असे बोलले जाते. प्रदीप शर्मांनी मुंबई क्राईम ब्रँचमध्ये असताना विविध टोळ्यांच्या, लष्कर-ए- तय्यबा सारख्या दहशतवादी संघटनांच्या अतिरेक्यांचा ज्याला 'एक्स्ट्रा ज्युडिशिअल किलिंग्स' म्हणतात त्या चकमकींमध्ये किंवा 'एनकाऊंटर' मध्ये खातमा केला.

xxx नांवाचा गुंड xxxअमूक ठिकाणी येणाऱ्या असल्याची खबर क्राईम ब्रँचचे पोलिस निरिक्षक प्रदीप शर्मा यांना मिळाली. त्यांनी त्या ठिकाणी सापळा रचला... हा वाँटेड असलेला गुंड एका टॅक्सीतून त्या ठिकाणी खाली उतरला...शर्मा यांनी त्याला शरण येण्याचे आवाहन केले....मात्र त्याने आपल्याकडच्या पिस्तुलातून शर्मा यांच्या दिशेने गोळी झाडली. प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात तो गुंड शर्मा यांच्या पिस्तुलाच्या गोळीने जबर जखमी झाला....त्याला XXXX रुग्णालयात तातडीने नेण्यात आले. पण उपचारापूर्वीच त्याला मृत घोषीत करण्यात आले.......सुमारे दहा वर्षांपूर्वी अशी वर्णने वृत्तपत्रांतून महिन्यातून दोन तीन वेळा तरी वाचायला मिळायची. पुढे मानवी हक्क वाल्यांचा प्रभाव वाढला आणि मुंबई पोलिसांची पिस्तुलं 'होल्स्टर' मध्ये स्थिरावली!

हे प्रदीप शर्मा. त्यांचे कुटुंब मुळचे उत्तर प्रदेशातल्या आग्र्याचे. नंतर हे कुटुंब महाराष्ट्रात आले. त्यांचे वडील धुळ्याच्या एका महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक होते. प्रदीप शर्मांचे एमएससी पर्यंतचे शिक्षण धुळ्यातच झाले. 1983 मध्ये त्यांनी महाराष्ट्र पोलिस दलात उपनिरिक्षक म्हणून प्रवेश केला. ही कारकिर्द पुढे मुंबईच्या पथ्थरवाली बिल्डिंगपर्यंत म्हणजे क्राईम ब्रँच पर्यंत पोहोचली. शर्मा यांच्या कारकिर्दीला खरी धार चढली ती युतीच्या पहिल्या सरकारच्या काळात. तत्कालिन गृहमंत्री (कै.) गोपीनाथ मुंडे यांनी शर्मा आणि (कै.) विजय साळस्करांना गुन्हेगारी टोळ्या नष्ट करण्याचे आदेश दिले. कै. साळस्करांकडे जबाबदारी होती गवळी टोळीला संपवण्याची आणि शर्मांकडे छोटा राजन व दाऊदच्या टोळीचा खातमा करण्याची.

पुढच्या काळात 'एनकाऊंटर्स'साठी मुंबई पोलिसांमध्ये अहमहिका लागायची, अधिकाऱ्यांचे हात गोळ्या झाडण्यासाठी शिवशिवत असत असे म्हणतात. याला काही काळ ब्रेक लागला तो जावेद फावडाच्या एनकाऊंटर प्रकरणात. पण नंतर या प्रकरणातून पोलिस मुक्त झाल्यानंतर मुंबईत पुन्हा 'एनकाऊंटर' सुरु झाली. मुंबईच्या टोळीवाल्यांच्या कारवायांना आळा घालण्यात (कै.) साळसकर आणि प्रदीप शर्मा यांचा मोठा वाटा आहे. दुर्दैवाने साळसकर 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झाले.

शर्मा यांच्यावर मधल्या काळात सावट आले होते. गुन्हेगारांशी संबंध असल्याच्या संशयावरुन 2008 मध्ये सरकारने शर्मा यांना निलंबित केले. त्यावेळी आपल्याला छोटा राजन टोळीने गुंतवले असल्याचा बचाव शर्मा यांनी घेतला. शर्मा यांना त्या काळात पोलिस संरक्षण होते, हे देखिल अपवादात्मक उदाहरणच म्हणावे लागेल. 2009 मध्ये शर्मा यांना पुन्हा पोलिस दलात सामावून घेण्यात आले. पण नंतर शर्मा पुन्हा अडकले ते लखनभय्या एनकाऊंटर प्रकरणात. वाशीचा हा गुन्हेगार अंधेरीच्या सातबंगला परिसरात झालेल्या एनकाऊंटरमध्ये मारला गेला. त्याच्या कुटुंबियांनी हा खून असल्याचे सांगत तक्रार केली आणि शर्मा व अन्य 13 जणांना या प्रकरणात अटक करण्यात आली.

या खटल्यातूनही शर्मा सुटले. उर्वरित जणांना मात्र जन्मठेपेसारख्या शिक्षा लागल्या. त्यापैकी काही जण अद्यापही ही शिक्षा भोगत आहेत. त्यानंतर शर्मा यांची नियुक्ती झाली ती ठाण्यात. ठाण्यात त्यांना साहिजकच क्राईम ब्रँचमध्ये नेमण्यात आले. तेथे त्यांनी गेल्याच वर्षी दावूद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला खंडणीच्या गुन्ह्यात अटक केली. हे सगळे उतार चढाव चित्रपटसृष्टीला आकर्षित न करतात तरच नवल. प्रदीप शर्मा यांच्या कारकिर्दीवर आधारित नाना पाटेकर यांची भूमिका असलेला 'अब तक छप्पन' हा हिंदी आणि महेश मांजरेकर यांची भूमिका असलेला 'रेगे' हा चित्रपट गाजला.

असे हे शर्मा आता नवी शिडी चढण्याच्या मार्गावर आहेत. त्यांची आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेटही झाल्याचे सांगण्यात येते. थोडक्यात 'खाकी' तून 'खादी' चढवणाऱ्यांच्या यादीत आता प्रदीप शर्मांचाही समावेश होणार हे नक्की!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT