malshej.jpg
malshej.jpg 
मुंबई

पर्यटकांना माळशेज घाटात बंदी; पर्यटक अन् व्यवसायिक नाराज

नंदकिशोर मलबारी

सरळगांव( ठाणे) : जसा चातक पक्षी पावसाची वाट पाहतो अगदी तशाच प्रकारे पर्यटक माळशेज घाटातील धबधब्यांची वाट पहात असतो. मात्र जिवित हानी टाळण्यासाठी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी 2 जुलै ते 31जुलै या कालावधी साठी पर्यटकांना माळशेज घाटात येण्यासाठी बंदी जाहीर केली आहे. त्यामुळे पर्यटकांकडून नाराजीचा सूर व्यक्त केला जात आहे. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी हे प्रतिबंधक आदेश जारी केले असल्याची माहीती टोकावडे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खरमाटे यांनी दिली.

पर्यटकांना भुरळ घालणारे माळशेज घाटातील धबधबे. कधी ऊन, कधी धुके अशा निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक घाटात कूटूंबासमवेत शनिवार, रविवार या सुटीच्या दिवसी हजेरी लावत असतात. अनेक पर्यटक मद्यपान करून या ठिकाणचा वातावरण दुषित करत असल्याने या घाटाचा नाव ही बदनाम झाले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस खात्याच्यावतीने चेक नाके व प्रत्यक्षात घाटात मोठी पोलीस फौज फाटा ठेवलेला आहे.  तरीही अतिउत्साही पर्यटकांनामुळे अनेक जणांचे बळी गेल्याने मागील वर्षीही याच महिन्यांत पर्यटकांसाठी बंदी जाहीर केली होती. 

गेले अनेक वर्ष पावसाळ्यात दरडी कोसळण्याचे प्रकारही होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून माळशेज घाटातील सर्व धबधबे, तालुक्यातील गेणेश लेणी, पडाळे डॅम, सिध्दगड, या ठिकाणी प्रतिबंधक आदेश जारी करण्यात आले आहेत.  छोट्या व्यवसायधारकांवर उपास मारीची पाळी आली आहे.माळशेज घाटात पर्यटकांची वर्दळ वाढली की, कणस, शेंगदाणे व भूईमूगाच्या शेंगा विकणाऱ्यांच्या बरोबरच छोटे -छोटे ढाबेवाल्यांचा व्यवसाय चांगला चालत असतो. अनेक जण चार महिने या ठिकाणी छोटा मोठा व्यवसाय करून आपली बाराही महिन्यांची शिदोरीची व्यवस्था करीत असतो. मात्र पावसाळ्याच्या सुरवातीलाच पर्यटकांवर प्रतिबंधक आदेश जारी केल्याने हातावर पोट असणारे व छोटे व्यवसाय करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ येईल अशी भिती व्यवसायिकांकडून व्यक्त केली जात आहे.

प्रतिबंधक आदेशाचे  पालन करावे असे आवाहन पोलीस खात्याच्या वतीने करण्यात आले आहे. या आदेशाचे भंग करणाऱ्या पर्यटकांवर पोलीस खात्याच्यावतीने कारवाई केली जाणार असल्याची माहीती सहाय्यक पोलीस निरीक्षक खरमाटे यांनी दिली.
- नंदकिशोर मलबारी,  

माळशेच घाटातील पर्यटकांना खूणावणार धबधबा (छायाचित्र-नंदकिशोर मलबारी)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Pune Drunk Driving Accident: कल्याणीनगरच्या आपघात प्रकरणी थातूरमातूर कारवाई? पुण्याच्या पोलिस आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण

MS Dhoni: 'माझं चेन्नईबरोबरचं नातं...', निवृत्ती घेणार की नाही चर्चेदरम्यान धोनीच्या CSK बद्दलच्या भावना आल्या समोर

Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT