मुंबई ः नोकरी शोधताना कंपन्यांची नफावाढीची क्षमता, आर्थिक वाढ, व्यवसायवृद्धी या मुद्यांना तरुण-तरुणींकडून प्राधान्य दिले जातेच. पण त्याचबरोबर कंपनीत समान संधी मिळण्याची शक्यता, कंपनीचे सामाजिक उत्तरदायित्व या मुद्यांवरदेखील लक्ष दिले जाते, असे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे.
महिंद्र ग्रूपतर्फे नुकताच महिंद्र गुड बिझनेस स्टडी हा अहवाल प्रकाशित करण्यात आला. ग्राहक, गुंतवणुकदार, कर्मचारी यांच्यासाठी चांगला उद्योग-व्यवसाय म्हणजे नेमकी काय संकल्पना असते, हे जाणून घेण्यासाठी वरील सर्वेक्षण करण्यात आले. त्यापैकी संभाव्य कर्मचाऱ्यांना नेमके काय वाटते याचा तपशील या अहवालात देण्यात आला आहे. दिल्ली, मुंबई, बंगलोर, चेन्नै, अहमदाबाद, हैदराबाद, कोईमतूर, जयपूर, चंदीगड, लखनौ या शहरांमधील अठरा ते पासष्ठ वयोगटातील दोन हजार 89 नोकरदार-कर्मचाऱ्यांशी यासंदर्भात चर्चा करण्यात आली.
आपण नोकरी करणार असलेल्या कंपनीची नफावाढीची क्षमता, आर्थिक वाढ या बाबींना 28.35 टक्के पुरुषांकडून तर 21.21 टक्के महिलांकडून प्राधान्य दिले जाते. मात्र त्याखालोखाल अन्य महत्वाच्या मुद्यांवरही लक्ष दिले जाते. कामात समान संधी मिळावी तसेच कामात वैविध्य असावे याकडे पुरुष कर्मचाऱ्यांचे लक्ष असते तर ती कंपनी पर्यावरणाबाबत सजग आहे का, यास महिला प्राधान्य देतात, असेही सर्वेक्षणात आढळले.
पर्यावरण रक्षणाबाबत कंपनी दक्ष आहे का याकडे 19.67 टक्के पुरुषांचे तर 12.37 टक्के महिलांचे लक्ष असते. कंपनीच्या एचआर विभागाची धोरणे चांगली आहेत का, समाजसेवा आणि सीएसआर यात कंपनी आपला वाटा उचलते का, यावर 32.70 टक्के महिलांचा तर 20.08 टक्के पुरुषांचा भर असतो. कंपनीत नव्या कल्पना, नवे विचार यांना वाव आहे का हे 11.89 टक्के पुरुष तर 6.75 टक्के स्त्रीया पाहतात. कंपनीचा व्यवसाय चांगला होत नसेल तर 81.16 टक्के महिला व 74.06 टक्के पुरुष ती नोकरी सोडतात असेही आढळून आले.
Equality, social responsibility are preferred when looking for a job report
---------------------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.