Crime
Crime 
मुंबई

पालघर तालुक्यातील सफाळे येथे दरोड्याचा प्रयत्न ; एका दरोडेखोराला अटक 4 जण फरार

प्रमोद पाटील

पालघर- तालुक्यातील सफाळे येथील सामंतवाडीत दरोडा टाकण्यासाठी आलेल्या पाच दरोडेखोरांपैकी एका दरोडेखोराला नागरिक आणि पोलिस यांच्या दक्षतेमुळे पकडण्यात यश आले असून चार दरोडेखोर फरार झाले आहेत.

सफाळे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला अगदीच हाकेवर सामंत वाडीत दिपक मोहन सामंत (वय 66) आणि माधवी दिपक सामंत (वय 64) हे वृद्ध जोडपं राहत आहे. गुरूवारी (ता.20) मध्यरात्री साधारण 1.45 च्या दरम्यान पाच दरोडेखोरांनी सामंत यांच्या बंगल्याच्या पाठीमागच्याबाजुचा दरवाजा फोडण्याचा प्रयत्न सुरू करत असताना कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाजाने शेजारी राहत असलेल्या भावेश पाटील यांनी खिडकीतून बाहेर पाहिले असता पाच अज्ञात व्यकती हातात शस्त्र घेऊन दरवाजा फोडण्याचा प्रयत्न करत होते.  भावेश यांनी सदर घटना आपला मित्र सैफ नाशिर शेख याला फोनवर सांगितली. शेख यांनी तत्काळ सफाळे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांच्यासह उपसरपंच राजेश म्हात्रे यांना सांगितली. या दोघांनीही क्षणाचाही विलंब न करता आपल्या सहकार्यांसह सामंतवाडी गाठली.
                
असा पकडला दरोडेखोर
पोलिस आणि ग्रामस्थ यांच्या तावडीतून सुटून गेलेल्या दरोडेखोरांचा पाठलाग अंधार आणि सुरू असलेल्या पावसामुळे न थांबवता सर्व नाकेबंदी करून दरोडेखोर गेले कुठे असा प्रश्न पडला होता. शेवटी रेल्वे स्थानकाच्या दिशेने पोलिस आणि ग्रामस्थ यांनी मोर्चा वळवला. पहाटे साडेचार दरम्यान मुंबई कडे जाणारया गाडी पकडण्यासाठी स्टेशन वर येऊन बसलेल्या प्रवाशांची तपासणी करत असताना आरोपी गोविंद गणपत पिंपळे  (वय 22, रा. निमगाव कोसळे, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर) याला हत्यारासह पोलिसांनीअटक केली. 

फासे पारधी टोळीच
अटक करण्यात आलेल्या दरोडेखोराकडे धारदार कोयता  आणि गिरमिट सापडले असून त्याच्यावर या आधी शिडीं  पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र तो आपल्या सोबत असलेल्या साथीदारांची नावे सांगत नाही. मात्र ही फासे पारधी टोळी असून या मुळे परिसरातील अनेक चोरया, दरोडे यांचा सुगावा लागण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, आरोपी पिंपळे यांच्यावर सफाळे पोलिस ठाण्यात  भारतीय दंड कलम 399 आणि 336 लावण्यात आले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांच्या सह पोलिस हवालदार रमेश कुंभार, विशाल वसावे, उपसरपंच राजेश म्हात्रे , भावेश पाटील, सैफ शेख आदींनी विशेष प्रयत्न केले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: पुन्हा सूरत पॅटर्न! शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेत केला भाजप प्रवेश..काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदी सोलापुरात दाखल; थोड्याच वेळात होणार सभा

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Health Care : अवकाळी पावसानंतर सावधगिरी बाळगा; सर्दीसह दमा, श्वसन विकारात होते वाढ

SCROLL FOR NEXT