मुंबई

मुंबईत प्लास्टिक बंदीचा फज्जा; बंदीनंतरही प्लास्टिक कचऱ्यात घट नाही

समीर सुर्वे

मुंबई : राज्यात प्लास्टिक बंदी असली तरी मुंबईच्या कचऱ्यातील प्लास्टिकचे प्रमाण कमी होत नाही. गेल्या दोन वर्षांपासून रोजच्या कचऱ्यातील प्लास्टिकचे प्रमाण हे 3.24 टक्केच आहे. 
महाराष्ट्रात मार्च 2018 पासून प्लास्टिक बंदी लागू झाली आहे. अपवादात्मक वापरासाठी प्लास्टिकचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे; मात्र तरीही बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर सर्रास सुरू असल्याचे चित्र आहे. महानगरपालिकेच्या 2019-20 या वर्षाच्या पर्यावरण स्थितीदर्शक अहवालात रोजच्या कचऱ्यातील प्लास्टिकचे प्रमाण 3.24 टक्के आहे, तर 2017-18 मध्ये हे प्रमाण 3.24 टक्के आहे. 

महानगरपालिकेने तीन वर्षांपूर्वी रोज 100 किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण होणाऱ्या संकुलांना ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे 2017-18 मध्ये रोज 7200 ते 7500 मेट्रिक टन कचरा जमा होत होता. हे प्रमाण आता 6500 ते 6800 मेट्रिक टन कचरा निर्माण होत आहे. कचऱ्याचे प्रमाण कमी झालेले असले तरी त्यातील प्लास्टिकच्या कचऱ्याचा हिस्सा कमी झालेला नाही. उलट 2015-16 या वर्षात शहरातील रोजच्या कचऱ्यातील प्लास्टिकच्या कचऱ्याचा हिस्सा 3 टक्के होता; मात्र तेव्हा रोज 6800 मेट्रिक टन कचरा जमा होत होता. 

राज्यात साडेचार कोटींचा दंड वसूल 
प्लास्टिकच्या पिशव्या, थर्माकॉल, प्लास्टिक थर्माकॉलपासून एकदाच वापरता येण्यासारख्या वस्तू, भांडी यांच्या वापरावर पूर्णपणे बंदी आहे. सुरुवातीच्या काळात या वस्तू वापरणाऱ्यांवर कारवाईही होत होती; मात्र आता पुन्हा फेरीवाल्यांकडे प्लास्टिकच्या पिशव्या दिसू लागल्या आहेत. राज्यातील महानगरपालिकांच्या हद्दीत 2018 पासून मार्च 2020 पर्यंत 85 हजार 840 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले असून, 4 कोटी 64 लाखांचा दंड वसूल केला आहे. बंदी असलेले प्लास्टिक वापरणाऱ्यांकडून 5 ते 25 हजार रुपयांचा दंड तसेच तीन महिन्यांची कैद अशा शिक्षेची तरतूद आहे. 

------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election 2026 : गोकुळ निवडणुकीत महायुतीचा फॉर्म्युला ठरला! जागावाटपावर मंत्री हसन मुश्रीफांचे मोठे भाष्य; म्हणाले, 'आता अदृश्य शक्ती लुप्त झालीय...'

मला वाईट वाटतं, मी का बोलले नाही.. प्रथा म्हणून डोहाळे जेवणात घडलेली ती गोष्ट; मृणाल कुलकर्णी आजही विसरलेल्या नाही

Tablet For Students: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार टॅबलेट! मुख्यमंत्र्यांचा निर्णय, DBTद्वारे थेट खात्यात रक्कम

Marathi News Live Updates : हिंगोलीत पंधरा दिवसात पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कोरड्या दुष्काळाची दाहकता वाढली

Vidarbha Rain Forecast : विदर्भात पावसाचा जोर वाढणार ; चक्रीवादळाचा प्रभाव, २४ सप्टेंबरनंतर मुसळधारेची शक्यता

SCROLL FOR NEXT