Mumbai News 
मुंबई

प्रकल्पबधितांना दिलासा! घराची किंमत २५ लाखांपेक्षा कमी तरी मिळणार 'एवढी' रक्कम

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - विविध प्रकल्पात बाधितांना आता २५ ते ४० लाखांपर्यंत मोबदला मिळणार आहे.‌ पालिकेच्या नवीन धोरणाला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. एखाद्या प्रकल्प बाधिताच्या घराची किंमत २५ लाखांपेक्षा कमी असली तरी त्या बाधिताला २५ लाखांचा मोबदला देण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पुनर्वसन करताना पर्यायी जागेत जाण्यास नकार देणाऱ्या बाधित कुटुंबाला आता सदनिका ऐवजी आर्थिक मोबदला देण्याच्या धोरणात प्रशासनाने बदल केला आहे. पात्र गाळे धारकाला ३० लाख रुपयांपर्यंत आर्थिक मोबदला देण्याचा निर्णय घेतला होता.

पालिकेच्या या निर्णयाला मंजुरी देत स्थायी समितीने या रक्कमेत वाढ करत ५० लाख रुपयांपर्यंत मोबदला देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पुन्हा एकदा पालिका प्रशासनाने धोरणात बदल करत कमीत कमी २५ लाख आणि जास्तीत जास्त ४० लाख रुपये एवढा आर्थिक मोबदला देण्याचे धोरण बनवले आहे. पालिका आयुक्त व प्रशासक डॉ इक्बाल सिंग चहल यांनी या नवीन धोरणाला मंजुरी दिल्याने प्रकल्प बाधितांना नवीन धोरणानुसार मोबदला मिळणार आहे.

प्रकल्पबाधित निवासी प्रकल्प बाधितांना ३०० चौ. फुट क्षेत्रफळानुसार आर्थिक मोबदल्याचे परिगणन केले असता शीव, वडाळा अँटॉप हिल (‘एफ/उत्तर) विभागात सुमारे २३.८२ लाख रुपये व कुर्ला (एल) विभागात सुमारे २४.३७ रुपये लाख इतका आर्थिक मोबदला द्यावा लागतो आणि तसेच वरळी, लोअर परेल, प्रभादेवी (जी/दक्षिण विभागात सुमारे ४६.५९ लाख रुपये व माहिम, दादर व धारावी (जी/उत्तर) विभागात सुमारे ४९.५९ लाख रुपये इतका आर्थिक मोबदला यावा लागतो.

याबाबत अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) यांच्याकडे झालेल्या बैठकीदरम्यान झालेल्या चर्चेनुसार श्रेणी (२) मधील पात्र झोपडीधारकांच्या आर्थिक मोबदल्याचे सरसकट परिगणन केल्यास महानगरपालिकेस अधिक आर्थिक बोजा सोसावा लागेल. त्याऐवजी किमान आर्थिक मोबदला २५ लाख व कमाल मोबदला ४० लाख दिल्यास तो एफ/उत्तर, एल. टी. आर/उत्तर इ. विभागात ३०० चौ. फुट फरसबंद क्षेत्राची सदनिका घेऊ शकेल. त्यामुळे श्रेणी (२) करिता किमान आर्थिक मोबदला २५ लाख व कमाल मोबदला ४० लाख व श्रेणी (१) साठी किमान आर्थिक मोबदला २५ लाख असावा, असा बदल करावा असे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) यांनी निर्देश दिले होते, त्यानुसार धोरणात समावेश करण्यात आला असल्याची माहिती मालमत्ता विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बंगळुरुतून जगभरात वाढवतायत 'ओळख मायबोलीची', देशविदेशातील हजारो विद्यार्थी शिकत आहेत मराठी

Rinku Singh Father Passed Away : क्रिकेटपटू रिंकू सिंगच्या वडिलांचे निधन, कर्करोगाशी झुंज अपयशी, नोएडातील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

आजचे राशिभविष्य - 27 फेब्रुवारी 2026

Paneer Fried Rice Recipe: उरलेला भात फेकू नका! फक्त 15 मिनिटांत बनवा रेस्टॉरंट-स्टाइल पनीर फ्राइड राइस

Panchang 27 February 2026: आजच्या दिवशी देवी कवच स्तोत्राचे पठण आणि ‘शुं शुक्राय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT