मुंबई

सावधान! कोरोनामुक्त होऊन घरी परतलेल्यांनाही होतोय पुन्हा त्रास! वाचा ही माहिती आली समोर...

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई ः महानगरीतील कोरोना रुग्णांची संख्या एका लाखावर गेली असली तरी त्यातील 67 हजार उपचार करुन घरी परतले आहे, असे सांगण्यात येते, पण कोरोनाचे परिणाम अजून अनेकांना जाणवत आहे.

कोरोनावरील उपचारानंतर घरी परतलेल्या रुग्णांना अशक्तपणा, थकवा जाणवत आहे तसेच श्वास घेतानाही त्रास होत असल्याचे वृत्त आहे. याशिवाय काहींनी वजन कमी झाले असल्याचेही सांगितले. विलेपार्ले येथील लता व्हर्गीस यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळून पंधरा दिवस झाले आहेत. त्यांनी घरी आल्यावर दहा दिवस खूपच थकवा जाणवत होता. त्यांनी आता आपली प्रकृती सुधारत असल्याचे सांगितले. मला खूप बोलल्यास थकवा जाणवत असे तसे श्वास घेतानाही त्रास होत असे, असे सांगताना त्यांनी आपण अद्याप घराबाहेर पडलो नसल्याचे सांगितले. 

गोरेगावच्या राजीकुमार नडार यांना कोरोनाची माफक लागण झाली होती. त्यांना घरीच विलगीकरण करण्यास सांगितले होते. मात्र दीड महिन्यात आपले सात किलो वजन कमी झाले तसेच अशक्तपणाही जाणवत होता. मात्र आता प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगितले. त्यांनीही आपण घराबाहेर पडणे टाळत असल्याचे सांगितले. 

बोरीवलीतील सुनील सावंत यांना मे महिन्यात बाधा झाली होती. त्यांनी आपल्या मे महिन्याच्या अखेरीस घरी सोडण्यात आले तसेच त्यांनंतर घरीच विलगीकरण करण्यास सांगितले. आता मी कामावरही जाण्यास सुरुवात केली आहे. कुटुंबियांनीही त्यांचे नित्याचे व्यवहार सुरु केले आहेत. 

कोरोनातून खूपसे रुग्ण पूर्ण बरे झाले आहेत, पण काहींना मोठ्या प्रमाणावर त्रास होऊ शकतो. त्यांना विषाणूंची बाधा तीव्र होऊ शकते तसेच काहींना घरी ऑक्सिजनही देण्याची वेळ येईल. अर्थातच काहींना दिर्घ काळ आरोग्याच्या प्रश्नास सामोरे जावे लागेल. कोरोनामुळे अन्य रोग होण्याचीही शक्यता असते, याकडे भाटिय रुग्णालयातील डॉ सम्राट शाह यांनी लक्ष वेधले. कोरोनातून बरे झाल्यावर डॉक्टरांचा सल्ला घेणे उपयुक्त ठरेल. त्याचबरोबर उपचारात कोणतीही हयगय करु नये, असेही त्यांनी सांगितले.

-------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BRICS Summit 2026 : पीएम मोदींनी पुतिन यांना भेट दिलेला 'तिरुक्कुरल' ग्रंथ काय आहे? जाणून घ्या संत तिरुवल्लुवर यांचा इतिहास

VIRAT KOHLI :लंडनमध्ये विराट कोहली अन् एकनाथ शिंदेंची खास भेट; विकासकामांपासून युवा टॅलेंटपर्यंत झाली चर्चा, नेमकं काय बोलणं झालं?

BRICS Summit Food: सत्तू, मखाना अन् काश्मिरी पदार्थ... ब्रिक्स परिषदेतले शाही मेन्यू कोणते? नॉनव्हेज आहे का?

Latest Marathi News Live Update : नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

ST Bus Accident : येरमाळा घाटात बसचा अपघात! प्रवाशांनी प्रत्यक्ष मृत्यूचा साक्षात्कार अनुभवल्याची थरारक घटना, क्षणार्धात बस सुमारे २० ते २५ फूट खोल खड्ड्यात कोसळली

SCROLL FOR NEXT