मुंबई

महाविकास आघाडीतील नेत्यांचे दौरे आणि कार्यक्रम रद्द ! 'शिक्षण मंत्रालय @ मुंबई'ही कोरोनामुळे रद्द

संजीव भागवत

मुंबई, ता. 22 : राज्यभरात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढल्याने सोमवारी 22 फेब्रुवारी रोजी मुंबईतील वरळी येथील नेहरू सेंटरमध्ये होणारा उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा 'उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय @ मुंबई' हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. आपण हा कार्यक्रम रद्द करत असल्याची माहिती सामंत यांनी एक ट्विट करून दिली आहे. 

मागील आठवड्याभरात मुंबई परिसरातसुद्धा मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आल्याने वरळी येथील कार्यक्रमाला मुंबई आणि एसएनडीटी विद्यापीठातून विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद मिळाला होता. मुंबई विद्यापीठातून 387 आणि एसएनडीटी विद्यापीठातून 230 अशा एकूण 617 जणांनी नोंदणी केली होती. त्यामुळे वरळी येथील होणाऱ्या या कार्यक्रमावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यातच हा कार्यक्रम रद्द केला जावा, अशी मागणीही केली जात होती. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केलेले आवाहन लक्षात घेऊन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आपला हा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

मागील अनेक दिवसांपासून मोठा गाजावाजा करून वरळी येथील कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र आता तो कार्यक्रम रद्द झाल्याने मुंबई आणि एसएनडीटी विद्यापीठातील अधिकारी-कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असल्याची प्रतिक्रिया मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. वैभव नरवडे यांनी दिली.

सामंत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ' उद्धव साहेब ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत, दिनांक 22 फेब्रुवारी 2021 रोजी होणारा उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय @ मुंबई हा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यास हा कार्यक्रम घेतला जाईल."

event organised by minister uday samant postponed due to higher tension of covid

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: ठाणे लोकसभा शिवसेनेचीच, नरेश मस्के यांना उमेदवारी! श्रीकांत शिंदेंचेही नाव कल्याणमधून जाहीर

Latest Marathi News Live Update : पुणे-बंगळुरू महामार्गावर मोठी कोंडी; पुण्याहून कोल्हापूरला जाणारी वाहतूक संथ गतीने

Abhijeet bhattacharya: "लग्नात गाणं गायल्यानं औकात कमी होते", म्हणणाऱ्या अभिजीत भट्टाचार्यांना गायकानं व्हिडीओ शेअर करत दिलं सडेतोड उत्तर

T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन; 'या' खेळाडूंना मिळणार अंतिम-11 मध्ये स्थान

Narendra Modi : काँग्रेसपासून सावध राहा ; लातूरमध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठीच्या प्रचारसभेत विरोधकांवर हल्ला

SCROLL FOR NEXT