Nana Patole sakal media
मुंबई

काँग्रेसमध्ये कुठलेही अंतर्गत वाद नाहीत - नाना पटोले

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav thackeray) यांना एक पत्र लिहिलं आहे. ते पत्र सध्या सोशल मिडियावर व्हायरल झालं आहे. हे पत्र उर्जा विभागाच्या गैरव्यवहाराशी संबंधित असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र हे उर्जा विभागाशी संबंधित नाही. नागपूरच्या खनिकर्म महामंडळात कोळसा (Coal purchasing) खरेदीबाबतचे जे टेंडर आहे त्यामध्ये खूप सारे निर्णय चुकीचे घेण्यात आलेत. असा उल्लेख या पत्रात आहे. त्यामुळं उर्जा विभागाचा याच्याशी काहीही संबंध नाही. काँग्रेसमध्ये वाद असल्याचे काही लोक दाखवत आहेत. असे कुठलेही अंतर्गत वाद काँग्रेसमध्ये नाहीत. असं स्पष्टीकरण नाना पटोले यांनी दिलं आहे. ( Everything is fine in Congress says Nana Patole)

काय लिहिलंय या पत्रात?

नागपूर खनिकर्म महामंडळाकडून कोळसा पुरवठा व कोळसा वॅाशिंगचे काम करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आलेली आहे. या प्रक्रियेमध्ये रखुमाई इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला खनिकर्म महामंडळाने पत्र पाठविले होते. यासंबंधी एक तक्रार दाखल झाली आहे. रखुमाई इन्फ्रास्ट्रक्चर ही कंपनी संजय हरदवाणी चालवित आहेत. या कंपनीचे कुठलेही नेटवर्थ,टर्नओवर आणि सेक्युरिटी क्लीअरंनस नाही. तसेच कोळसा वॅाशिंग करण्याचा काहीही अनुभव नाही. तसेच ज्या कंपनीसोबत संयुक्त भागीदारी केलेली आहे, त्यांना ट्रीब्युनल यांच्यामार्फत काळ्या यादीत टाकण्यात आले आहे.

रखुमाई कंपनी निविदेच्या कुठल्याही अटी व शर्थींची पुर्तता करत नाही. तरीही त्यांना या कामासाठी पात्र ठरविण्यात आले आहे. त्यांना गैरमार्गाने पात्र ठरविण्यात आलं आहे. कोळसा वेळेवर पुरवठा करण्यासाठी ते अपात्र आहेत व त्याचा परिणाम वीज उत्पादनावर होईल. हे प्रकरण नियमबाह्य व आर्थिक घोटाळ्याशी संबंधित आहे. त्यामुळे या निविदा प्रक्रियेची सखोल चौकशी करुन त्याला स्थगिती द्यावी, असं नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT