Shinde gat vs BJP Esakal
मुंबई

Shinde gat vs BJP: मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात शिंदे गटकडून भाजप पदाधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला

ठाण्यामध्ये शिवसेनेचा शिंदे गट व भाजपमधील अंतर्गत धूसफूस चव्हाट्यावर

सकाळ डिजिटल टीम

ठाण्यामध्ये शिवसेनेचा शिंदे गट व भाजपमधील अंतर्गत धूसफूस चव्हाट्यावर आली आहे. पोस्टर लावण्यासाठीच्या वादातून वागळे इस्टेटमध्ये भाजप पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याचे समोर आले आहे. भाजपने याबाबत शिंदे गटावर आरोप केले आहेत.

राज्यातील सत्ताधारी मित्रपक्ष शिंदे गट व भाजपमध्ये वाद पेटला आहे. ठाण्यामध्ये दोन्ही गटात प्रचंड राडा झाला असून सोशल माध्यमातून या वादाला खतपाणी घातले जात आहे. 'ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील परबवाडी भागात भाजपाच्या पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण झाल्याची घटनासमोर आली असून हा हल्ला शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाने केल्याचा आरोप ठाणे भाजपकडून करण्यात येत आहे'. असे ट्विट ठाणे भाजपच्या ट्विटर हँडलवरून करण्यात आले आहे.

दरम्यान या सर्व प्रकारानंतर ठाण्यात दोन्ही पक्षांमधील अंतर्गत धूसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली असल्याची चर्चा आहे. भाजप वागळे मंडळ सरचिटणीस प्रशांत जाधव यांच्यावर हा जिवघेणा हल्ला करण्यात आला आहे. शिवसेना पक्षाचे माजी नगरसेवक यांच्याकडून हा हल्ला करण्यात आला असल्याचा आरोप जाधव यांच्या भावाने केला असून शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास कशिश पार्क येथे ही घटना घडली. जाधव यांना त्वरित ठाण्याचा सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drug Racket : पुण्यात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी डिलिव्हरी अ‍ॅपचा वापर; मोठे रॅकेट उघड, चार जण अटकेत

Satara Politics: सातारा झेडपीची अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड रद्द करा;राष्ट्रवादीचे विभागीय आयुक्तांकडे अपील, जिल्हाधिकारी, एसपींबाबत तक्रार!

Yo Yo Honey Singh Pune show : यो यो हनी सिंगचा पुण्यातला शो होणार रद्द, थेट एसपींकडे तक्रार; गाण्यावर घेत आक्षेप

What is Anjaneri Ropeway Project? हनुमान भक्तांसाठी मोठी बातमी! सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी अंजनेरीला मिळणार नवं रूप; आता डोंगरावर चढण्याची कसरत संपणार!

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

SCROLL FOR NEXT