Vivek-Patil-Arrested
Vivek-Patil-Arrested 
मुंबई

शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना 'इडी'कडून अटक

सुरज सावंत, रामनाथ दवणे

Vivek Patil Arrested: कर्नाळा बँक घोटाळ्यात मनी लाँडरिंगप्रकरणी राहत्या घरून घेतलं ताब्यात

पनवेल: रायगड जिल्ह्यातील कर्नाळा बँकेत कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाला असून बँकेचे अध्यक्ष व माजी आमदार विवेक पाटील यांना अटक करण्याबाबत ईडीने पत्रक जारी केले आहे. या पत्रकानुसार ईडीने विवेक पाटील यांना त्यांच्या पनवेल येथील घरातून ताब्यात घेतलं आहे. या गैरव्यवहारात मनी लाँडरिंग (Money Laundering) झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. पनवेलमध्ये या गैरव्यवहारात विरोधात काही महिन्यांपूर्वी मोर्चे काढण्यात आले होते. विवेक पाटील यांच्या धोरणांमुळे ठेवीदार संकटात सापडले असल्याची ओरड या मोर्च्यात दिसून आली. या कारवाई दरम्यान विवेक पाटील यांच्या घराचीही झाडाझडती ईडीने घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. (Ex MLA Vivek Patil arrested for Money Laundering case of Karnala Bank in Panvel Raigad)

मिळालेल्या माहितीनुसार, रायगड जिल्ह्यातील ‘कर्नाळा नागरी सहकारी बँक‘ गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने माजी आमदार विवेकानंद पाटील यांना पनवेल येथून मंगळवारी रात्री अटक केली. या प्रकरणातील 512 कोटी रुपयांच्या संशयित मनी लाँडरिंग प्रकरणी त्यांना अटक करण्यात आले असून त्यांना बुधवारी न्यायालयापुढे हजर करण्यात येणार असल्याची माहिती 'ईडी'च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. कर्नाळा बँकेत कोट्यावधींचा गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर आल्यानंतर बँकेच्या व्यवहारांवर मर्यादा आली होती. ठेवीदार आणि खातेधारकांना त्यांच्या हक्काचे पैसे परत मिळावे ठेवीदारांनी आंदोनही केले हो आंदोलनही केले होते. यावेळी पनवेलमधील स्थानिक आमदाराने याप्रकरणात ईडीला पुरावे सादर केले होते.

कर्नाळा नागरी सहकारी बँक गैरव्यवहाराप्रकरणी रायगड जिल्हा विशेष लेखापरीक्षकांनी बँकेचे अध्यक्ष आणि माजी आमदार विवेक पाटील यांच्यासह संचालक, अधिकारी अशा 76 जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्याआधारे याआधीच सर्वांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. या गुन्ह्याला आधार बनवून ईडीने याप्रकरणी झालेल्या संशयीत मनी लाँडरींगचा तपास सुरू केला होता. त्या अंतर्गत संशयीत आरोपींनी 512 कोटी 54 लाख रुपये बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने कर्ज घेऊन व्यवहारात आणले, असल्याचे ईडीच्या तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर याप्रकरणी मंगलवारी पाटील यांना पनवेलमधून अटक करण्यात आली, असे वरिष्ठ अधिका-याने अटक केली. ईडीचे सहसंचालक-2 यांच्या अंतर्गत याप्रकरणाचा तपास सुरू आहे. दरम्यान पाटील यांना बुधवारी न्यायालयापुढे हजर करण्यात येईल, असे अधिका-याने सांगितले. कर्नाळा बँकेतील ठेवीदारांच्या ठेवींबाबतही ईडी पुढील कारवाई करण्याची शक्यता आहे.

(संपादन- विराज भागवत)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar: ...तर पेट्रोलचे दर 20 रुपयांनी वाढले असते; परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे वक्तव्य चर्चेत

RTE Maharashtra: पालकांना मोठा दिलासा! RTE च्या सुधारणेला हायकोर्टाची स्थगिती; नवे नियम तुर्तास होणार नाहीत लागू

Rohit Sharma IPL 2024 : सुट्टी नाही! मेगा लिलावासाठी रोहितला खेळावेच लागणार... माजी विकेटकिपरने कोणते संकेत दिले?

Share Market Closing: शेअर बाजाराने पुन्हा केली निराशा; मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये मोठी घसरण, गुंतवणूकदारांचे नुकसान

Naresh Goyal News : जेट एअरवेजचे चेअरमन नरेश गोयल यांना मोठा दिलासा! अखेर हायकोर्टाकडून जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT