Vasant More 
मुंबई

Vasant More: वसंत मोरे आज 'मशाल' हाती घेणार! ठाकरेंनी कोणता शब्द दिला? 100 गाड्यांच्या ताफ्यासह मुंबईकडे रवाना

Vasant More will join Uddhav Thackeray Group: आपण पक्षात पक्ष प्रवेश करू इच्छितो असं त्यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितलं होतं. ठाकरे गटाकडूनही याबाबत सकारात्मक संकेत देण्यात आले होते.

कार्तिक पुजारी

मुंबई- वसंत मोरे हे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार आहेत. मागील आठवड्यात त्यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्याचवेळी आपण पक्षात पक्ष प्रवेश करू इच्छितो असं त्यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितलं होतं. ठाकरे गटाकडूनही याबाबत सकारात्मक संकेत देण्यात आले होते.

वसंत मोरे यांनी आज सकाळी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. मी आज ठाकरे गटात प्रवेश करणार आहे. मी कोणत्याही पदाधिकाऱ्याला माझ्यासोबत येण्याची बळजबरी केलेली नाही. ज्यांना माझ्यासोबत यायचंय ते येतील. ज्यांना यायचं नाही ते येणार नाहीत. मला ठाकरे गटाकडून कोणताही शब्द मिळालेला नाही. मी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार काम करत राहीन, असं मोरे म्हणालेत.

मिळालेल्या माहितीनुसार, वसंत मोरे १०० गाड्यांचा ताफा घेऊन मुंबईकडे निघाले आहेत. त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते आहेत. प्रत्येकाच्या गाडीवर मशाल चिन्हाचे स्टीकर लावण्यात आले आहे. आज दुपारी बाराच्या दरम्यान मातोश्री या ठिकाणी वसंत मोरे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित होणार आहे.

वसंत मोरे या आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि त्यानंतर वंचित बहुजन आघाडी मध्ये होते. लोकसभा निवडणुकीच्या वेळी उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी महाविकास आघाडीतून उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते, मात्र उमेदवारी न मिळाल्याने लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी वंचित बहुजन आघाडी कडून उमेदवारी घेतली होती. आता विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना ठाकरे गटात वसंत मोरे प्रवेश करत असल्याची माहिती आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, वसंत मोरे हे खडकवासला किंवा हडपसर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. याबाबत ठाकरे गटासोबत चर्चा झाल्याचं देखील बोललं जात आहे. ठाकरेंकडून शब्द मिळाला असल्याने त्यांनी मशाल हाती घेतली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VHP Garba Ban : गरब्यात मुस्लिमांना बंदी घालण्याच्या विश्व हिंदू परिषदेच्या मागणीला केंद्रीय मंत्र्यांचा विरोध; संविधानाचा दिला दाखला

'बोक्या सातबंडे' चित्रपटात पेपर विकणाऱ्या अभिनेत्याला ओळखलंत का? आज मराठीसोबतच बॉलिवूडही गाजवतोय, कोण आहे हा?

Marathi News Live Updates : काँग्रेस नेते दिग्विजय सिंह उज्जैन ते अयोध्या पदयात्रा काढणार

Nanded News : नवसंशोधनाला मिळणार नांदेडची प्रयोगभूमी; ग्रामीण टेक्निकल कॅम्पसकडे ‘आविष्कार २०२६’ची धुरा!

Ambad News : तलावात खांदेमळणीला गाय, बैल धूण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय सौरभ नरोडेचा पाण्यात बुडून मृत्यू; धनगरपिंपरीसह परिसरात हळहळ व्यक्त

SCROLL FOR NEXT