मुंबई

अनिल देशमुख यांच्या वर्तणुकीची CBI चौकशी व्हावी, परमबीर सिंह यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली याचिका

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप आला. परमबीर सिंह यांनी  थेट महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांवर वसुलीचे गंभीर आरोप आपल्या 'लेटरबॉम्ब'द्वारा लावलेत. या संपूर्ण प्रकरणाची CBI मार्फत चौकशी व्हावी यासाठी परमबीर सिंह यांनी थेट सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले होते. मात्र सुप्रीम कोर्टाने परमबीर सिंह यांनी आधी हायकोर्टात याचिका दाखल करावी अशी सुनावणी केली.   

या पार्श्वभूमीवर परमबीर सिंह यांनी आज मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वर्तणुकीची CBI चौकशी व्हावी अशी याचिका परमबीर सिंह यांनी दाखल केली आहे. 

परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हंटलेले की, "महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा भ्रष्ट कारभार पोलिस दलातील अनेक अधिकाऱ्यांच्या नजरेत आला होता. परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. अनिल देशमुख देशमुख हे अनेक पोलिस अधिकाऱ्यांना त्यांच्या निवासस्थानी बोलवायचे आणि पैसे गोळा करण्याच्या सूचना द्यायचे. तसेच ते पोलिस अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाजात तसेच आर्थिक व्यवहारात सल्ला आणि निर्देश द्यायचे. पैसे गोळा करण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांचा ते उपयोग करायचे. त्यांचे हे भ्रष्ट आचरण अनेक पोलिस अधिकाऱ्यांच्या नजरेस आले होते, असे परमबीर सिंग यांनी पत्रात म्हटले आहे. 

ex mumbai commissioner param bir singh file petition against anil deshmukh to seek CBI enquiry

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : कोकण, घाटमाथा, विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’; उर्वरित कोकण, विदर्भात जोरदार पाऊस शक्य

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

MS Dhoni Birthday: धोनी का आहे दिग्गज खेळाडू, याची साक्ष देणारे हे रेकॉर्ड्स माहित आहेत का?

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

SCROLL FOR NEXT