मुंबई

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काढ्यांचे अतिसेवन ठरतंय घातक; तज्ज्ञांचं मत

भाग्यश्री भुवड

मुंबई : कोविड- 19 वरील लशीची प्रतीक्षा अवघे जग करत असताना, अभूतपूर्व अशा नोव्हेल कोरोनाविषाणूचा जोर कायम आहे. मात्र, कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून घरगुती पद्धतीने तयार केलेल्या वेगवेगळ्या काढ्यांचे सेवन मोठ्या प्रमाणात वाढले असून त्याचे काही दुष्परिणाम दिसत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

फोर्टिस रुग्णालयातील जनरल फिजिशियन डॉ. संजय शहा यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोविड-19 आजाराच्या भीतीमुळे ‘काढ्यां’चे (वनस्पतीजन्य पदार्थांचे मिश्रण) सेवन वाढले आहे. त्यात सहसा आले, लिंबू, लसूण, हळद, मिरे, कोरफड आणि बोरवर्गीय फळांचा समावेश होतो. 
घरगुती काढ्यांच्या अतिसेवनामुळे एका तरुण रुग्णामध्ये शस्त्रक्रियेनंतर रक्तस्राव होत असल्याचे आढळले. रुग्णाच्या केसचे संपूर्ण अन्वेषण केल्यानंतर तसेच वैद्यकीय इतिहासाचे तपशीलवार मूल्यमापन केल्यानंतर आमच्या असे लक्षात आले की, रुग्ण घरी केलेल्या काढ्याचे खूप मोठ्या प्रमाणात सेवन करत होता. त्यामुळे त्याच्या शरीरात अंतर्गत रक्तस्राव सुरू झाला असे उदाहरण डॉ. शहा यांनी दिले. 

इतर आजार असलेल्यांसाठी काढे घातकच - 
ज्या व्यक्तींना अन्य काही आजार (कोमॉर्बिडिटीज) आहेत, विशेषत: जे रुग्ण रक्त पातळ करणारी औषधे किंवा अन्य जुन्या आजारांसाठी औषधे घेत असतात त्यांच्यासाठी हे काढे घातक ठरू शकतात. यातून रक्तस्रावाची प्रवृत्ती वाढू शकते. रक्तस्राव कोठून होतो यावरही बरेच काही अवलंबून आहे. काही ठिकाणांहून होणारा रक्तस्राव फार धोकादायक नसतो, तर मेंदू किंवा आतड्यांतून होणारा रक्तस्राव प्राणघातक ठरू शकतो.  

काढ्यांच्या अतिसेवनाचे दुष्परिणाम - 

उष्ण मिश्रणांचे सेवन केल्यास तोंडातून वरच्यावर रक्तस्राव होणे किंवा अल्सर्स यांसारखे दुष्परिणाम जाणवू शकतात. मसाल्यांमुळे शरीरात अतिरिक्त उष्णता निर्माण होते आणि त्यामुळे नाकातून रक्तस्राव होऊ शकतो; यामुळे अन्ननलिकेत घर्षण निर्माण होऊन एसोफॅगीयल इरोजन होऊ शकते, यातून गॅस्ट्रो-एसोफॅगीयल रिफ्लक्स होऊन पचनावर परिणाम होऊ शकतो. यामुळे रोगप्रतिकारशक्तीवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण होते. हळद किंवा कोरफडीसारखे घटक पदार्थ अतिरिक्त प्रमाणात घेतल्यास त्याने यकृताला धोका पोहोचू शकतो. त्यातून कावीळ होण्याची शक्यता असते. यामुळेही यकृतात रक्तस्राव होऊ शकतो, लिव्हर फेल्युअर ही होतो.  त्यामुळे, कोणत्याही घरगुती काढ्याचे सेवन करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांशी बोला असा सल्ला डॉ. शहा यांनी दिला आहे.

Excessive use of herbs to boost immunity is dangerous 

----------------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT