Crime sakal
मुंबई

Dombivali Crime : माजी नगरसेविकेच्या पतीला 20 लाखाचा गंडा घालणारे निघाले प्लंबर, लिफ्टमन; पोलिसांनी केली तिघांना अटक

ज्योतिषाला हात दाखवून नशीब पलटवू असे आमिष दाखवून त्याला फुस लावून दूरवर नेत धमकावत पिस्तूलचा धाक दाखवत तिघांनी 20 लाखाचा गंडा घातल्याची घटना कल्याण आडीवली परिसरात घडली होती.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - केबल व्यावसायिक तथा माजी नगरसेविकेचा पती सतत आजारी रहात होता. ज्योतिषाला हात दाखवून नशीब पलटवू असे आमिष दाखवून त्याला फुस लावून दूरवर नेत धमकावत पिस्तूलचा धाक दाखवत तिघांनी 20 लाखाचा गंडा घातल्याची घटना कल्याण आडीवली परिसरात घडली होती. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी तिघाना अटक केली असून विशेष म्हणजे यातील आरोपी हे प्लंबर, लिफ्टमन निघाले. गिरीष खैरे, (वय 50), विनयकुमार यादव उर्फ राघव(वय 22), आणि विनायक कराडे (वय 35) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

कल्याण पूर्वेतील केबल व्यावसायिक विजय गायकवाड हे आणि त्यांची पत्नी माजी नगरसेविका काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्या या परिस्थितीचा गैरफायदा घेत गिरीश खैरे नावाच्या व्यक्तीने गायकवाड यांना लुटण्याचा कट रचला. गायकवाड यांना डांबून ठेवण्यासाठी एक खोली देखील त्याने भाड्याने घेतली.

तसेच तिसरा आरोपी विनय कुमार यादव याला 15 हजार रुपये देऊन बिहार येथून गावठी कट्टा खरेदी केला. ठरलेल्या प्लॅन नुसार गिरीशने 24 सप्टेंबरला विजय यांना आपल्या ओळखीतील एका ज्योतिषाकडे नेण्याचे आमिष दाखवले. आरोपी विनायक कराडे हा ज्योतिषी असल्याचे त्यांनी गायकवाड यांना सांगितले. त्यानंतर, आडीवली येथील एका इमारतीत विजय गायकवाड यांना नेण्यात आले. जिथे गिरीशचा साथीदार विनायक कराडे ज्योतिषाच्या वेशात तयार होता आणि त्याच्यासोबत विनय यादव देखील होता.

गिरीशने तेथून निघून गेल्यानंतर, विनायकने गायकवाड यांचा हात पाहण्याचे नाटक केले आणि बंदुकीचा धाक दाखवत 20 लाख रुपयांची मागणी केली. मात्र, पकडले जाण्याच्या भीतीने विनायक आणि विनय तिथून पळून गेले. त्यांनी गायकवाड यांच्याकडून 27 हजार रोख आणि तीन महागडे फोन जबरदस्तीने काढुन घेवून निघुन गेले.

विजय गायकवाड यांनी तात्काळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. मानपाडा पोलिसांनी त्वरीत सूत्र हलवत तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदार यांच्या मार्फत शोध घेऊन गिरीश खैरे याला अटक केली. पुढील तपासात विनायक कराडे आणि विनय यादव या दोघांची नावे समोर आली. विनायक कराडे हा एक लिफ्टमन असून विनय हा प्लंबर आहे. पोलिसांनी या दोघांना अटक करून देशी कट्टा जप्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Software Engineer Privacy : भाड्याच्या घरात आंघोळ करणाऱ्या 23 वर्षीय सॉफ्टवेअर अभियंता तरुणीचा गुप्तपणे काढला व्हिडिओ; 30 वर्षीय MBA पदवीधराचं घृणास्पद कृत्य

Pune crime news : पुण्यात चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचारानंतर दगडाने ठेचून हत्या; मृतदेह झुडपात लपवला, मुंबई-बंगळूर महामार्गावर लोकांचा आक्रोश

Mango City: फळांच्या राजाचं 'हे' आहे माहेरघर! 'मँगो सिटी'चा आंबा थेट रशिया-अमेरिकेपर्यंत फेमस कसा झाला? वाचा

Latest Marathi News Live Update : पश्चिम बंगालमधील १४ केंद्रांवर आज फेरमतदान; केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय

लग्नाचे नाव घेताच, पलटला... मोहम्मद शमीच्या भावावर महिलेचे गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT