Fraud sakal
मुंबई

मुलीला सिनेमात काम देण्याचा बहाणा; उपमुख्यमंत्र्यांच्‍या नावे व्यापाऱ्याची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : चित्रपटात काम मिळवून देण्याच्या बहाण्याने एका महिलेने खारघरमधील व्यावसायिकाकडून दोन लाख रुपये उकळल्याचे समोर आले. तसेच त्यांचे पैसे परत न देता त्यांना धमकावल्याप्रकरणी खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. प्रियंका (सिमा) काळे असे संशयित आरोपीचे नाव आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपले मावस सासरे व पितांबर काळे हे सासरे असल्याची थाप तिने मारली होती.

श्रीकृष्ण गोसावी (राह. आंबेगाव बुद्रुक, पुणे) यांचा प्रॉपर्टी कन्सल्टन्सी व शेअर मार्केटिंगचा व्यवसाय आहे. डिसेंबर २०२० मध्ये त्यांच्या प्रियंका काळे हिच्यासोबत खारघरमधील लॅन्डमार्क बिल्डिंगमध्ये ओळख झाली होती. तिने आपण चित्रपट निर्मितीचे काम करत असल्याचे सांगितल्याने गोसावी यांनी आपल्या १३ वर्षीय मुलीलासुद्धा चित्रपटात काम करण्याची इच्छा असल्याचे सांगितले. ‘रणझुंज’ नावाचा मराठी चित्रपट बनवत असल्याचे सांगून त्यामध्ये बालकलाकारांची गरज असल्याचे सांगितले. गोसावी यांच्या मुलीला सिनेमात काम करण्याची संधी देण्याचे आश्‍वासन दिले.

काही दिवसांनी प्रियंकाने सिनेमासाठी एडिटिंग मशिन घेण्यासाठी पाच लाख रुपये कमी पडत असल्याचे सांगत पैशांची मागणी केली. सदर रक्कम १० दिवसात परत करण्याचे आश्‍वासन दिले होते. गोसावी यांनी दोन लाख रुपये दिले. यानंतर गोसावी यांनी फोन करून पैशांची मागणी केली असता वेगवेगळी कारणे सांगून पैसे देण्यास टाळाटाळ केली. प्रियंकाने बँक खात्यात पैसे नसतानाही गोसावी यांना धनादेश दिला होता.

सलमान खानच्या नावानेही थाप

उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिचे मावस सासरे व दिग्दर्शक पितांबर काळे हे सासरे असल्याचे सांगून गोसावी यांच्यावर छाप पाडली होती. तसेच या सिनेमात अभिनेता सलमान खान प्रमुख पाहुणा कलाकाराचे काम करण्याचे सांगितले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 4th T20I : संजू सॅमसन बाकावरच... दुखापतीमुळे भारतीय संघात करावे लागले दोन बदल; भारताने टॉस जिंकला

China Shoe Factory Fire: बूट कारखान्यात भीषण आग! २८ कामगारांचा होरपळून मृत्यू; थरारक व्हिडिओ समोर, कुठे घडली घटना?

Marathi News Live Updates: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ

Maharashtra Rain: पश्चिम घाटात यंदा पावसाचा विक्रम! पहिल्या आठ दिवसांत इतका पाऊस का झाला? हवामान तज्ज्ञांनी सांगितले मोठे कारण

महाराष्ट्रात UCC लागू करण्याची तयारी! महायुती सरकारने घेतला मोठा निर्णय; ७ सदस्यीय तज्ज्ञ समिती स्थापन

SCROLL FOR NEXT