मुंबई

सर्व्हेच्या कामातून शिक्षकांची मुक्तता करा; ठाणे महापालिकेकडे मागणी

राजेश मोरे

ठाणे : मागील काही महिन्यांत सात प्रकारच्या सर्व्हेचे काम शिक्षकांना देण्यात आले आहे. त्यामुळे आता या कामातून मुक्तता मिळावी, अशी मागणी शिक्षकांनी ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांच्याकडे केली आहे. या मागणीची दखल घेत विविध प्रकारच्या सर्व्हेचे काम करणाऱ्या शिक्षकांना यापुढे कोणत्याही नव्या सर्व्हेच्या कामाला लावू नये, अशी सूचना महापौर म्हस्के यांनी पालिका अतिरिक्त आयुक्त यांना केली आहे. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या मोहिमेत शिक्षकांना कामाला लावण्यात आले होते; परंतु यामुळे पालिका शाळांमधील ऑनलाईन शिक्षण बंद झाले आहे. आधी सर्व्हे करा, मग विद्यार्थ्यांना शिकवा, असाच काहीसा फतवा शिक्षकांच्या बाबतीत काढण्यात आला आहे. आधी तीन सर्व्हे याच प्रकारचे करण्यात आल्यानंतर आता पुन्हा नव्याने सर्व्हेचे काम आल्याने विद्यार्थ्यांना शिकवायचे कसे, असा प्रश्‍न शिक्षकांना पडला आहे. या मोहिमेत ठाण्यातील खासगी आणि महापालिकेचे सुमारे 1350 शिक्षक सहभागी झाले असून त्यांच्यामार्फत हे काम सुरू आहे. 

विशेष म्हणजे यापूर्वी केलेल्या सर्व्हेत शहरातील सुमारे 45 शिक्षकांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातून तीन जणांचा मृत्यू देखील झालेला आहे. असे असताना जे काम शिक्षकांचे नाही, ते करावे लागत असल्याने शिक्षकांच्या मनात संतापाची लाट आहे. त्यातच "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या सर्व्हेचे काम पूर्ण झाल्यानंतर आता नव्या कोणत्याही सर्व्हेच्या कामात आम्हाला जुंपू नका, अशी विनवणी शिक्षकांनी महापौरांना केली. या संदर्भात शुक्रवारी (ता. 23) सायंकाळी शिक्षक संघटनांनी महापौर नरेश म्हस्के, महापालिका अतिरिक्त आयुक्त यांची भेट घेतली. यापुढे शिक्षकांना शिकवण्याचेच काम करू द्या, अशी मागणीही त्यांनी केली. 
-------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यातून महिला लेक्चररला अटक, विद्यार्थ्यांमध्ये खळबळ!

Aakhri Sawal Review: गांधीजींची हत्या ते बाबरी पतन; कसा आहे संजय दत्तचा 'आखरी सवाल'? वाचा रिव्ह्यू!

US Fuel System: अमेरिकेतील पेट्रोल पंपांवरील इंधन प्रणाली हॅक! ATG सिस्टम ठरले धोकादायक; तपास यंत्रणांचा कुणावर संशय?

IPL चालू असतानाच हार्दिक पांड्या माहिकाची करणार लग्न? चर्चेला उधाण, पण नेमकं सत्य काय?

विरार-अलिबाग कॉरिडॉरला गती! शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मिळणार

SCROLL FOR NEXT