मुंबई

काय म्हणायचं याला? दिल्ली मुंबई प्रवासात हरवले 50 इन्फ्रारेड थर्मामीटर

सकाळ वृत्तसेवा

मुंबई ः कोरोना महामारीच्या आव्हानास सामोरे जाण्यासाठी इन्फ्रारेड थर्मामीटर मोलाचे आहेत. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या विक्रेत्याने दिल्लीहून मागवलेले 50 इन्फ्रारेड थर्मामीटर नवी दिल्ली - मुंबई रेल्वे प्रवासात हरवले आहेत. हे इन्फ्रारेड थर्मामीटरची किंमत अडीच ते तीन हजार होती. 

रेल्वे मंत्रालय पार्सल ट्रेनच्या सुविधांचा लाभ कसा घेतला जात आहे हे सातत्याने सांगत आहे. मात्र आता इन्फ्रारेड थर्मामीटरचा एक बॉक्सच हरवला आहे. नवी दिल्लीतून मुंबईला इन्फ्रारेड थर्मामीटरचे चार बॉक्स पाठवण्यात आले. नवी दिल्लीतून हे चार बॉक्स निघाले असल्याचा संदेश दिल्लीतील सप्लायरना पाठवण्यात आला तसेच तो संदेश मुंबई सेंट्रलवर पॅकेज घेणाऱ्यांनाही पाठवण्यात आला. मात्र मुंबई सेंट्रलवर एक पार्सल कमी आल्याचा दावा करण्यात आला आहे. या एका बॉक्सची किंमत दीड लाख होती. 

इन्फ्रारेड थर्मामीटर हे भारतात आयात केले जात आहेत. ते नवी दिल्लीत येत आहेत. मुंबईतील जीवनावश्यक वस्तूंचे पुरवठादार ते दिल्लीतून मागवत आहेत. मुंबईतील पुरवठादारांनी दिल्लीत इन्फ्रारेड थर्मामीटर दाखल झाल्याचे समजल्यावरच पार्सल ट्रेनसाठी आरक्षण केले होते. आता मुंबईतील पुरवठादार या एका बॉक्ससाठी सातत्याने मुंबई सेंट्रल स्थानकावर जात आहेत. तसेच त्यांनी उत्तर रेल्वे आणि पार्सल विभागास इ-मेलही पाठवला आहे. मात्र त्याचे कोणतेही उत्तर आलेले नाही. या प्रकरणाची चौकशी सुरु असल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT