Mumbai Sakal
मुंबई

Mumbai : डोंबिवलीत स्वच्छ सर्वेक्षणाची पोलखोल; व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल

ओला सुका कचरा वर्गीकरण, कचऱ्याची विल्हेवाट लावणे आदि प्रयोग पालिका स्तरावर सुरु आहेत.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - कल्याण डोंबिवली शहराची अस्वच्छ शहर म्हणून असलेली ओळख पुसण्यासाठी पालिका स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रयत्न होत आहेत. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत सहभाग घेत पालिका प्रशासन जनजागृती करत आहे. यासाठी शहरात जागोजागी बॅनरबाजी देखील करण्यात आली आहे.

मात्र अनेक ठिकाणी या बॅनरच्या बाजूलाच मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले असल्याचे पहायला मिळते. शहरातील स्टेशन परिसर काही प्रमाणात स्वच्छ असला तरी ग्रामीण भाग, एमआयडीसी परिसर, कल्याण पूर्व आदि भागातील अनेक ठिकाणी जागोजागी कचरा साचला असून त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.

या त्रासाला कंटाळूनच काही जागरुक नागरिकांनी पालिकेची पोलखोल करणारा व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल केला असून त्यावर प्रतिक्रीया उमटत आहेत.

रस्त्याच्या दोन्ही बाजूला कचऱ्याने लगडलेला परिसर, त्यातून येणारी दुर्गंधी, त्यावर घोंगावणाऱ्या माशा, घंटागाडीने कचरा उचलून नेल्यानंतर त्याठिकाणी साचलेला गाळ, सांडपाणी असे चित्र शहरात आज ही हमखास दिसत आहे. शहर स्वच्छतेसाठी पालिका प्रशासन विविध योजना राबवित आहे. प्लास्टिक पिशव्यांचा वापर करु नये.(Latest Marathi News)

ओला सुका कचरा वर्गीकरण, कचऱ्याची विल्हेवाट लावणे आदि प्रयोग पालिका स्तरावर सुरु आहेत. रस्त्यावर कचरा टाकून परिसर अस्वच्छ करणाऱ्यांविरोधात पालिका प्रशासन दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे सांगत त्याठिकाणी बोर्ड देखील लावण्यात आले आहेत. या प्रयोगांमुळे स्टेशन परिसर कचरा मुक्त झाला असला तरी ग्रामीण भागात कचऱ्याचे मोठ्या प्रमाणात साम्राज्य दिसून येत आहे.

राज्य शासनाकडून घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धांत सहभाग घेत पालिका प्रशासनाने मानाचे पुरस्कार प्राप्त केले आहेत. स्वच्छ सर्वेक्षणात देखील पालिकेची चांगली कामगिरी आत्तापर्यंत राहीली आहे. असे असले तरी ठराविक भागांकडे पालिका प्रशासनाचे लक्ष नसल्याने नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.

शहर स्वच्छतेविषयी तसेच स्वच्छ सर्वेक्षणाविषयी माहिती देणारे जनजागृती करणारे फलक पालिका प्रशानाने अनेक ठिकाणी लावले आहेत.

या बॅनरवर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला आहे. ज्या ठिकाणी कचरा व दुर्गंधी आहे अशाच ठिकाणी पालिकेने हे फलक लावले असून तेथे स्वच्छता करण्याकडे पालिकेचे लक्ष नसल्याने नागरिकांनीच आता पालिकेच्या या कामाची पोलखोल केली आहे.

शहरातील अस्वच्छतेचे चित्र दाखविणाऱा व्हिडीओ बनवित जागरुक नागरिकाने तो समाज माध्यमावर व्हायरल केला आहे.

डोंबिवली मधील मानपाडा रोड उद्योग नगर येथे स्वच्छ सर्वेक्षण बॅनर लावेल आणि त्याच बॅनरच्या बरोबर खालीच रस्त्यावर चिखल साचलेला दिसत असून पालिकेचे स्वच्छ सर्वेक्षण हे का ? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. यावर नागरिकांच्या प्रतिक्रीया उमटत असून नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT