मुंबई

पॉलिटेक्निकच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ; या तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना भरता येणार अर्ज

तेजस वाघमारे

मुंबई : दहावीनंतर अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या ( पॉलिटेक्निक) ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार विद्यार्थांना 4 सप्टेंबरपर्यंत अर्ज भरता येणार असून तात्पुरती गुणवत्ता यादी 7 सप्टेंबरला तर अंतिम गुणवत्ता यादी 12 सप्टेंबरला जाहीर केली जाणार आहे. प्रवेशासाठी 72 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत.

प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या आणि बारावीनंतरच्या प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरीता आवश्यक असणारे जातीचे प्रमाणपत्र, नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे विद्यार्थ्यांना सादर करता यावीत, यासाठी प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. सुधारित प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

कोरोनाचा पार्श्वभूमीवर तंत्र शिक्षण संचालनालयाने यंदा ऑनलाइन कागदपत्र पडताळणीची संकल्पना राबविली आहे. त्यानिसर ऑनलाईन अर्ज भरणे व निश्चित करणे याकरिता उमेदवार त्यांच्या सोयीनुसार कागदपत्रे पडताळणीची ऑनलाइन किंवा ऑफलाईन यापैकी एक पर्याय निवडू शकणार आहेत. उमेदवाराचा अर्ज व कागदपत्रे सुविधा केंद्राद्वारे पडताळला जाणार व निश्चित केला जाणार आहे.

--------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT