मुंबई

कंगनावरील फौजदारी तक्रारीच्या तपासासाठी मुंबई पोलिसांना मुदतवाढ

सुनिता महामुनकर

मुंबई : सतत वादग्रस्त विधाने करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावतविरोधात गीतकार जावेद अख्तर यांनी केलेल्या फौजदारी तक्रारीवर तपास करण्यासाठी आज अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने मुंबई पोलिसांना मुदत वाढ दिली.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात कंगनाने रिपब्लिक टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत अख्तर यांच्याबाबत आक्षेपार्ह विधाने केली होती. या व्हिडीओला यूट्यूबवर लाखो हिटस मिळाल्या आहेत. मात्र कंगनाने केलेले आरोप धांदात खोटे असून त्यामध्ये तथ्य नाही. या व्हिडीओमुळे माझी नाहक बदनामी झाली आणि मानसिक त्रास झाला आहे, असा आरोप करणारा मानहानीचा फौजदारी दावा अख्तर यांनी केला आहे. अंधेरो महानगर दंडाधिकारी न्यायालयात आज यावर सुनावणी झाली. पोलिसांनी अद्याप कंगनाचा जबाब नोंदविला नाही, त्यामुळे अधिक अवधी द्यावा अशी मागणी पोलिसांकडून करण्यात आली. न्यायालयाने ही मागणी मान्य केली आणि पुढील सुनावणीला अहवाल दाखल करण्याचे निर्देश दिले. पुढील सुनावणी ता. 1 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

बॉलिवूडमध्ये माफिया राज असल्याचा आरोप कंगनाने केला होता. यामध्ये अख्तर आणि दिग्दर्शक महेश भट यांच्या नावाचा उल्लेख केला होता, असे तक्रारीमध्ये म्हटले आहे.

Extension of time for Mumbai Police to investigate criminal complaint against Kangana

------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT