External Affairs department approves MLA foreign visits 22 MLAs of left Study tour of European countries mumbai Sakal
मुंबई

Mumbai : आमदारांच्या परदेश दौऱ्याला परराष्ट्र खात्याची मंजुरी; राज्यातील २२ आमदार रवाना

राज्याच्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या युरोपीय देशांच्या अभ्यास दौऱ्यास अखेर केंद्र सरकारच्या परराष्ट्र खात्याची मान्यता

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्याच्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या युरोपीय देशांच्या अभ्यास दौऱ्यास अखेर केंद्र सरकारच्या परराष्ट्र खात्याची मान्यता मिळाली असून आज २२ आमदारांचे शिष्टमंडळ या दौऱ्यासाठी रवाना झाले. या दौऱ्याला परराष्ट्र खात्याची मान्यता नसल्याने तसेच आमदारांचे पुरेसे संख्याबळ नसल्याने या दौऱ्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. याबाबत ‘सकाळ’ ने २२ ऑगस्ट रोजी वृत्त दिले होते.

या अभ्यास दौऱ्यातील सदस्य २४ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत ३ युरोपीय देशांमध्ये प्रवास करणार आहेत. या अभ्यास दौऱ्यात सहा अभ्यासभेटी आणि बैठका होणार आहेत. अभ्यास दौऱ्यावरील शिष्टमंडळाचे नेतृत्व विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे करणार असून फ्रॅंन्कफर्ट (जर्मनी), ॲमस्टरडॅम (नेदरलँड) आणि लंडन (ब्रिटन) या शहरांना अभ्यास दौऱ्यावरील विधानसभा सदस्यांचे शिष्टमंडळ भेट देईल. या शिष्टमंडळात ११ महिला सदस्याही सहभागी झाल्या आहेत.

अभ्यास दौऱ्यात प्रारंभी फ्रॅंन्कफर्ट येथे सामाजिक, सांस्कृतिक तसेच कृषी आणि दुग्ध उत्पादन क्षेत्रांतील तज्ज्ञांबरोबर तसेच भारताच्या उच्चायुक्तांसमवेत बैठक होईल. ॲमस्टरडॅम येथे नेदरलॅंडच्या विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांबरोबर चर्चा होईल.

लंडनमध्ये उच्चायुक्तांचीही भेट घेणार

त्याचप्रमाणे लंडन येथे देखील भारताचे लंडनमधील उच्चायुक्त, संयुक्त राष्ट्र महिला आणि हक्क समानता विचारमंच, लंडन, लंडनमधील मराठी मंडळाचे पदाधिकारी, ब्रिटनच्या संसदेतील राष्ट्रकुल संसदीय मंडळ मुख्यालय आणि महासचिव यांच्यासमवेत देखील यावेळी भेट होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : सन्मानिय उद्धव ठाकरे म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

Mumbai : आमचं नातं शरीर संबंधाच्या पलिकडचं, आजही...; विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेचा खळबळजनक दावा

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

SCROLL FOR NEXT