मुंबई

अमृत पिऊन कुणी सत्तेत बसत नाही हे फडणवीसांना कळलं पाहिजे ; नवाब मलिक

देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खासदार शरद पवार यांच्यावर टीका केली होती

सकाळ वृत्तसेवा

देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खासदार शरद पवार यांच्यावर टीका केली होती

मुंबई : पवारसाहेबांचे राजकारण संपले आहे असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) बोलले होते त्यावेळी चमत्कार घडला होता आणि आताही ते टीका करत आहेत. देवेंद्र फडणवीस टीका करतात त्यावेळी चमत्कार घडतो त्यामुळे २०२४ मध्येही चमत्कार घडवून आणू असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे (National Congress Party) मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी व्यक्त केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती त्याला नवाब मलिक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. जेव्हा देवेंद्र फडणवीस तुम्ही शाळेत होतात त्यावेळी १९८४ साली लोकसभेच्या निवडणुकीत भाजपची संख्या दोनवर गेली होती. तुमचे खासदार डबलसीट सायकलवरून संसदेत जात होते हे विसरला आहात असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला आहे.

ही लोकशाही आहे अमृत पिऊन कुणी सत्तेत बसत नाही हे देवेंद्र फडणवीस तुम्हाला कळलं पाहिजे असेही नवाब मलिक म्हणाले. पवारसाहेब किंवा राष्ट्रवादी काँग्रेसने पवारसाहेब पंतप्रधान होतील असा कुठलाही दावा केलेला नाही उलट पवारसाहेब देशातील सर्व राजकीय पक्षांना एकत्र करण्यासाठी काम करत आहेत. विरोधकांच्या एकीमुळे मोदी सरकार सत्तेबाहेर जाईल असेही नवाब मलिक म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT