मुंबई

एका भामट्याने थेट पनवेल आयुक्तांच्याच नावाने उघडलं फेक फेसबुक अकाऊंट; मित्रांकडे केली पैशांची मागणी

दीपक घरत

पनवेल : पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या नावाने अज्ञाताने बनावट फेसबुक अकाऊंट तयार करून यांच्या मित्रांकडे पैशांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पनवेल शहर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून शोध सुरू केला आहे. 

पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या फेसबुक अकाऊंटवरून अज्ञात व्यक्तीने गत आठवड्यात वेगवेगळ्या मित्रांसोबत चॅटींग करुन त्यांना गुगल पेद्वारे पैसे ट्रान्सफर करण्याची मागणी केली होती. मित्रांनी याबाबतची माहिती देशमुख यांना दिल्यावर त्यांना धक्का बसला. त्यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटची तपासणी केली असता, त्यांच्या नावाने अज्ञात व्यक्तीने बनावट फेसबुक अकाऊंट तयार करून वेगवेगळ्या मित्रांसोबत चॅटींग केल्याचे आढळले. तसेच त्याने गुगल पेद्वारे पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितल्याचेही आढळले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी तत्काळ आपले फेसबुक अकाऊंट बंद करून आपले फेसबुक खाते अज्ञाताने हॅक केल्याची माहिती मित्रांना दिली. तसेच त्यांच्या नावाने कुणी पैशांची मागणी केल्यास कुठल्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार न करण्याचे सुचित केले. याप्रकरणी त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात आयटी ऍक्‍ट नुसार गुन्हा दाखल करून शोध सुरू केला आहे.  

 Fake account on the name of the Commissioner Panvel police Inquiry

--------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT