मुंबई

पंतप्रधान कर्ज योजनांच्या नावाने बनावट अॅप्लिकेशनः अडीच लाख नागरिकांची फसवणूक

अनिश पाटील

मुंबई:  पंतप्रधान विशेष कर्ज योजनांच्या नावाने बनावट अॅप्लिकेशन तयार करणा-या टोळक्याने देशभरातील अडीच लाख रुपयांची फसवणूक करून चार कोटींची माया जमवल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. दै. सकाळने सर्वप्रथम याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होते.

याप्रकरणी संजीव कुमार(36), प्रांजुल राठोड(27), रामनिवास कुमावत(25) आणि विवेक शर्मा(42) अशी अटक आरोपींची नावे आहेत.  संजीव कुमार हा उत्तर प्रदेशातील अलीगड येथील रिवासी असून राजकीय पक्षाचा पदाधिकारी आहे. त्याला 15 फेब्रुवारीला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आरोपीला 22 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

आरोपींविरोधात भादंवि कलम 419, 420, 465, 468, 170, 34 सह माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायदा कलम 66(क) आणि 66(ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी प्रधानमंत्री योजना लोन, पीएम लोन योजना लोन, पीएमवायएल लोन, सर्वोत्तम फायनान्स लोन सर्विस अशा नावाने 9 अॅप्लिकेशन तयार केले होते. त्यावर पंतप्रधानांचे छायाचित्र आणि राजमुद्रा यांचा वार करण्यात आला होता. या कर्जासाठी आरोपींनी 900 ते 3 हजार रुपये प्रोसेसिंग फीच्या नावाने देशातील शेकडो व्यक्तींकडून घेतले. 

 आरोपींनी तोतयागिरीसह राजमुद्रा तसेच ओळखपत्र यांचा गैरवापर केला आहे. तसेच आरोपींनी नागरिकांना जाळ्यात ओढण्यासाठी दोन नामांकित वृत्तपत्रांमध्ये जाहिरातही दिली होती. त्यामुळे अनेकांनी आरोपींकडे पैसे भरले आहेत. आरोपींकडून 18 मोबाईल, 10 हार्ड डिस्क, 3 राऊटर व एक पेनड्राईव जप्त करण्यात आला आहे.

---------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Fake applications name Prime Minister Special Loan Scheme fraud 2.5 lakh people

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT