मुंबई

फेक 'टीआरपी' प्रकरण! गुन्हेशाखेच्या पोलिसांकडून आणखी एकाला अटक

अनिश पाटील

मुंबई : फेक टीआरपीप्रकरणी गुन्हेशाखेच्या पोलिसांनी आणखी एकाला शुक्रवारी अटक केली. अटक आरोपीने याप्रकरणातील संशयीत आरोपी अभिषेक कोलवडे याला पळण्यास मदत केल्याचा आरोप आहे.  याप्रकरणी अटक आरोपींची संख्या नऊ वर पोहोचली आहे. दरम्यान, याप्रकरणी बनावटीकरण करण्यात आल्याचे निष्पन्न झाले असून त्या अनुषंगाने कलम वाढवण्यात आले आहे.

हरिष कमलाकर पाटील(45) असे अटक आरोपीचे नाव असून तो चांदिवली येथील रहिवासी आहे. मॅक्स मीडियाशी संबंधीत संशयीत आरोपी अभिषेक कोलवडे याचा सध्या गुन्हे शाखा शोध घेत असून त्याचे व अटक आरोपी पाटीलचे घनिष्ठ संबंध असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्या कंपनीच्या खात्यातही पाटीलची संशयीत देवाण-घेवाण झाली असल्याचे गुन्हे शाखेच्या तपासात निष्पन्न झाले आहे. चौकशीत पाटीलने कोलवडेला पळून जाण्यासाठी मदत केल्याचे गुन्हे शाखेच्या तपासात समोर आल्यानंतर याप्रकरणी पाटीलला अटक करण्यात आली. ही याप्रकरणातील नववी अटक आहे. याशिवाय याप्रकरणी संशयीत आरोपींनी बनावटीकरणही केल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर शुक्रवारी याप्रकरणी भादंवि कलम 212, 406, 465 व 468 यांचाही समावेश करण्यात आला आहे. दरम्यान पोलिस याप्रकरणी अटक आरोपी पाटीलच्या बँक खात्याची तपासणी करणार आहे.

यापूर्वी याप्रकरणी दिनेश विश्वकर्मा(37) व रामजी वर्मा(44), हंसा कंपनीचा विशाल वेद भंडारी (21), अंधेरीतील बोमपेली नारायण मिस्त्री (44), बॉक्स सिनेमाचे नारायण नंदकिशोर शर्मा (47), फक्त मराठीचे शिरीष सतीश पत्तनशेट्टी (44) आणि उत्तर प्रदेशमधून विनय त्रिपाठी व उमेश मिश्रा यांना अटक करण्यात आली आहे.

संपूर्ण प्रकरणात फॉरेन्सिक ऑडिट करण्यात येणार आहे. संशयित वाहिन्यांच्या खात्यातील पैशांची व व्यवहारांची तपासणी होणार आहे. रिपब्लिक टीव्हीसह फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमाच्या  यांची नावे याप्रकरणी आली आहे. याशिवाय आणखी वाहिन्यांच्या नावाचीही चर्चा आहे. पण त्याबाब अद्याप ठोस पुरावे मिळाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले याप्रकरणी आतापर्यंत टीआरपी स्कॅम प्रकरणात 40 हून अधिक जणांचे जबाब नोंदवण्यात आलेत.

---------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 3rd ODI: २-० ने मालिका जिंकली अन् आता टीम इंडियात होणार मोठा फेरबदल? तिसऱ्या वनडेत ‘या’ स्टार्सची एन्ट्री, कोण होणार OUT?

Pune News : पुण्यात २२ तासांत १२३ मुलींचे अपहरण झाल्याचा दावा खोटा; सोशल मीडियावरील ती ‘रील’ निराधार, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन

Latest Marathi News Live Update : भारताच्या लेकींनी रचला इतिहास! चीनचा पराभव, ४४ वर्षांनंतर हॉकीत सूवर्णपदक

Custard Apple Season : धारूरचा हंगाम संकटात! दुष्काळाने सीताफळाचा गोडवा हिरावला; मजुरांच्या रोजगारावर होणार परिणाम

Aundha Nagnath Temple : औंढा नागनाथ मंदिर भाविकांसाठी महिनाभर बंद; नित्यपूजा मात्र सुरू राहणार

SCROLL FOR NEXT