मुंबई

फेक टीआरपी प्रकरण: 'फक्त मराठी' चॅनलच्या मालकाला जामीन मंजूर

- सुनीता महामुणकर

मुंबई, ता. 29 : फेक टीआरपी प्रकरणात मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या फक्त मराठी या चॅनलचे मालक शिरीष पतनशेट्टी यांना आज सत्र न्यायालयाने पन्नास हजार रुपयांचा सशर्त जामीन मंजूर केला. टीआरपी वाढविण्यासाठी बेकायदेशीरपणे पैसे दिले असा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. पतनशेट्टी यांनी एड. अनिकेत निकम यांच्यामार्फत जामीनासाठी अर्ज केला होता. गुरुवारी यावर अतिरिक्त सत्र न्या. पी आर सित्रे यांच्यापुढे सुनावणी झाली. फक्त मराठी या चॅनलचा टीआरपी कधीही आकस्मिक पद्धतीने वाढलेला नाही आणि चॅनलच्या उत्पन्नातदेखील वाढ झालेली नाही, असा युक्तिवाद निकम यांनी केला.

पोलिसांनी केलेले आरोप हे तथ्यहीन आहेत आणि फक्त मराठी चॅनलने टीआरपी वाढवण्याकरता पैसे दिले यासंदर्भातला ठोस पुरावादेखील पोलिसांनी दाखल केला नाही, असा दावा त्यांनी केला. तसेच केवळ फक्त मराठी या एकाच चॅनलला यामध्ये गोवले आहे, असाही युक्तिवाद केला.

युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने पतनशेट्टी यांना जामीन मंजूर केला. तसेच जामीन रकमेएवढाच अन्य एक हमीदार दाखल करणे, तपासाला सहकार्य करणे, साक्षी पुरावे प्रभावित न करणे अशा अटी न्यायालयाने घातल्या आहेत.

विशिष्ट घरांमध्ये पैसे देऊन बोगसपणे टीआरपी वाढवून जाहिरातींंचा लाभ घेतला, असा गुन्हा पोलिसांनी नोंदविला आहे. बार्क या ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिलने यासंबंधी तक्रार केली आहे. याबाबत अन्य काही चॅनलची चौकशी सुरू असून पोलिसांनी अकरा जणांना अटकही केली आहे.

( संपादन - सुमित बागुल )

fake trp case fakta marathi channel owner granted bail by court

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

Family Court Elections: कौटुंबिक न्यायालय वकील संघटनेत ‘एकता’ पॅनेलचा पूर्ण वर्चस्व; अध्यक्षपदी ॲड. सुनीता जंगम, उपाध्यक्षपदी ॲड. कोमल देशमुख व ॲड. राहुल पडवळ

बंदी असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश; सलग दोन दिवसांत दोन तरुणांचा मृत्यू, पांडवकडा धबधब्यातील घटना

SCROLL FOR NEXT