file photo 
मुंबई

...तर महापालिकेच्या दारात "जनाजा' 

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : मुंब्रा भागात काही समाजकंटकांमुळे डॉक्‍टर मृत्यूचे प्रमाणपत्र देत नाहीत. त्यामुळे मृतदेह घरात ठेवून कुटुंबीयांना प्रमाणपत्र मिळवण्यासाठी वणवण करावी लागत आहे. प्रशासनाने ही समस्या तातडीने न सोडवल्यास मृतदेह घेऊन महापालिका मुख्यालयाच्या दारात उभा राहीन, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक शानू पठाण यांनी स्थायी समितीच्या बैठकीत दिला.

ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक शुक्रवारी (ता. 17) नरेंद्र बल्लाळ सभागृहात झाली. या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शानू पठाण यांनी मुंब्रा भागातील काही डॉक्‍टर मृत्यूचे प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करत असल्याचा मुद्दा मांडला. तेथील काही समाजकंटक माहिती अधिकार कायद्याचा गैरवापर करून डॉक्‍टरांना त्रास देत आहेत. त्यामुळे डॉक्‍टर नैसर्गिक मृत्यूचे प्रमाणपत्र देत नाहीत. परिणामी एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यास कुटुंबीयांना मृतदेह घरातच ठेवून प्रमाणपत्र मिळवण्यासाठी डॉक्‍टरांची शोधाशोध करावी लागते. त्यासाठी काही वेळा तर हजारो रुपये मोजावे लागतात, असे पठाण यांनी सांगितले.

ठाणे महापालिकेच्या अनास्थेमुळे ही वेळ आल्याचा आरोप मुंब्रा-कौसा भागातील नागरिक करत आहेत. या प्रकाराला आरोग्य खाते जबाबदार असल्याची तक्रार आहे. त्यामुळे ही समस्या न सोडवल्यास "जनाजा' घेऊन मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर येऊ. त्यानंतर होणाऱ्या परिणामांना प्रशासन जबाबदार असेल, असा इशाराही पठाण यांनी दिला. त्यानंतर स्थायी समितीचे सभापती राम रेपाळे यांनी ही समस्या तत्काळ निकाली काढण्याचे आदेश दिले. 

पुढील आठवड्यात बैठक 
ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे यांनी येत्या आठवड्यात आरोग्य अधिकारी डॉ. वाळवीकर आणि मुंब्रा-कौसा येथील डॉक्‍टरांची बैठक घेण्याचे आश्‍वासन दिले. या बैठकीनंतर डॉक्‍टरांना महापालिकेच्या वतीने मृत्यू प्रमाणपत्र देण्यासंदर्भात आदेश देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China Ministers: चीनमधील शी जिनपिंग सरकार हादरलं! दोन बड्या नेत्यांना फाशीची शिक्षा; न्यायालयाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?

Eknath Shinde: वादळामुळे एकनाथ शिंदेंचे हेलिकॉप्टर हवेतच अडकले; जुहू विमानतळावर थरारक लँडिंग, पाहा व्हिडिओ

Latest Marathi News Live Update : ठाण्यात अवकाळी पाऊस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं

वैभव सूर्यवंशी २१ व्या वर्षी निवृत्त होईल! सहा वर्षानंतर त्याची क्रिकेट कारकीर्द संपुष्टात येईल? कोणी केलीय ही भविष्यवाणी?

Ratnagiri Beach Assault : आरे-वारे बीचवर हुल्लडबाजी! मुंबईच्या पर्यटकांना दमदाटी मारहाण, चौघांवर पनवेलमध्ये गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT