मुंबई

मराठमोळा बॅाडीबिल्डर जगदीश लाडचे कोरोनाने निधन

दोन वेळा मिस्टर इंडियाचा किताब जिंकला होता

दीनानाथ परब

दोन वेळा मिस्टर इंडियाचा किताब जिंकला होता

वयाच्या ३४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

- नितीन संकपाळ

नवी मुंबई: बॉडीबिल्डिंग क्षेत्रातील एक मोठे नाव आणि अनेक महत्त्वाच्या स्पर्धा जिंकणारा मराठमोळा बॉडीबिल्डर जगदीश लाड यांचे कोरोनामुळे आज निधन झाले. ते ३४ वर्षांचे होते. जगदीश लाड यांच्या निधनाच्या बातमीने अनेकांना धक्का बसला आहे. बॉडीबिल्डींग क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. जगदीश यांनी प्रचंड मेहनतीने शरीरयष्टी कमावली होती.

जगदीश लाड हे फिटनेस बाबत अत्यंत जागरुक आणि दक्ष होते. त्यांच्या फोटोकडे पाहिल्यानंतर कोरोना व्हायरस किती घातक आहे, त्याची कल्पना येते. जगदीश लाड मूळचे नवी मुंबईचे, व्यवसायाच्या निमित्ताने ते आता बडोद्यामध्ये स्थायिक झाले होते. त्यांनी बडोद्यात मागच्यावर्षी जीम सुरु केली होती. तिथे ते तरुणांना व्यायामाचे धडे द्यायचे. काही दिवसांपूर्वी जगदीश यांना कोरोनाची लागण झाली होती. अखेर आज त्यांचे निधन झाले.

जगदीश लाड यांनी दोन वेळा नवी मुंबई क्षेत्र श्री, एकवेळा नवी मुंबई महापौर श्री, तीन वेळा महाराष्ट्र श्री चा किताब जिंकला होता. मिस्टर इंडिया स्पर्धेत एक सुवर्णपदक जिंकलं होतं. मुंबईत झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत ब्राँझ पदकाची कमाई केली होती. आपल्या पिळदार शरीरयष्टीने जगदीश लाड लगेच सगळ्यांचे लक्ष वेधून घ्यायचा. त्यांच्या निधनामुळे बॉडी बिल्डींग विश्वाचे मोठे नुकसान झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT