मुंबई

बॉलिवूड मेकअप आर्टिस्टसह ड्रग्ज पेडलरलाही NCB कडून अटक

अनिश पाटील

मुंबई: बड्या प्रोडक्शन हाऊसच्या विभाग प्रमुख असलेला मेकअप आर्टिस्ट सूरज गोडांबेला केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाने(एनसीबी) गुरूवारी अटक केली. गेल्या काही वर्षात गाजलेल्या चित्रपटांसाठी त्याने काम केले आहे.

सूरजकडून कोकेनचे 15 छोटे बॉक्स सापडले आहेत. त्या प्रत्येक बॉक्समध्ये 11 ग्रॅम कोकेन असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. ती कोकेनच्या सेवन प्रमाणापेक्षा अधिक मात्र व्यावसायिक प्रमाणापेक्षा कमी असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

गोडांबेला ड्रग्स पेडलरसह अटक करण्यात आली आहे. दोघांविरोधात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींच्या माध्यमातून बड्या सेलेब्रिटींना कोकेन पुरवण्यात येत होते का, याबाबत एनसीबी तपास करत आहे.

बुधवारी एनसीबीने अंधेरी पश्चिम परिसरात विशेष मोहिम राबवली. रिगेल महाकाला याला अटक करण्यात आली. त्याच्या चौकशीनंतर ओशिवरा परिसरातही शोध मोहिम राबवण्यात आली. त्याच्या चौकशीत उच्च प्रतिचे मलाना क्रीम(हशीश), अफीम आणि 16 लाख रुपये रोख जप्त करण्यात आली होती. त्यांची किंमत दोन कोटी 62 लाख रुपये आहे. याप्रकरणी आणखी  ड्रग्स वितरक मोहम्मद आझम जुम्मन शेख याला अटक करण्यात आली होती. त्याच्या संपर्कात काही हायप्रोफाईल व्यक्ती असल्याचे निष्पन्न झाले.

14 जूनला अभिनेता सुशांत राजपूतच्या मृत्यूनंतर ड्रग्स तस्करांविरोधात विशेष मोहिम सुरू केली आहे. त्याअंतर्गत अनेक बड्या तस्करांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी यापूर्वीच अभिनेता अर्जून रामपाल आणि त्याची प्रेयसी गेब्रिल्ला डेमेट्रीअॅडेस यांची चौकशी केली आहे. अर्जुनने यापूर्वीच या सर्व आरोपांचे खंडन करत आपले ड्रग्सशी घेणे देणे नसल्याचे सांगितले होते. त्यापूर्वी याप्रकरणी गेब्रिल्ला डेमेट्रीअॅडेसचा भाऊ अँगिसिलाऊस याला अटक केली होती. 18 ऑक्टोबरला लोणावळा येथे त्याच्याकडून ड्रग्स जप्त करण्यात आले होते. तसेच अर्जून रामपालची चौकशी झाली, त्या दिवशीच एनसीबीने पॉल बार्टेलची चौकशी केली होती. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती.

---------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Famous Bollywood make up artist Suraj Godambe nabbed NCB

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs SLW Final : स्मृती मानधनाची विश्वविक्रमी खेळी! शफाली वर्मासोबत इतिहास घडवला; भारताच्या 'सुवर्ण'पदकाचा पाया भक्कम

Manoj Jarange Patil Protest : मनोज जरांगे पाटील पुन्हा अडचणीत? आंदोलनाशी संबंधित आर्थिक व्यवहार आयकर विभागाच्या रडारवर

Kagal-Peth Naka Traffic News : कागल-पेठ नाका महामार्गाचे सहापदरीकरण रखडले; MIDC, वाहनधारकांची मोठी गैरसोय, लक्ष्मी टेकडीसह कणेरीवाडीतील रस्ते अपूर्ण

Asian Games: Smriti Mandhana ने नवा वर्ल्ड रेकॉर्ड करत घडवला इतिहास! धवनलाही मागे टाकत विराट-धोनीच्या पंक्तीत मिळवलं स्थान

Marathi News Live Updates : हिंगोलीत पंधरा दिवसात पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कोरड्या दुष्काळाची दाहकता वाढली

SCROLL FOR NEXT