नवीन पनवेल : चवणे (ता. पनवेल) येथील महेंद्र देशमुख या शेतकऱ्याने रविवारी मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री या निवासस्थानी जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले होते. आज (ता. 6) देशमुख यांनी पनवेल तहसील कार्यालयात कुटुंबासह आंदोलन केले.
बॅंकेच्या न घेतलेल्या कर्जामुळे हैराण झालेले चवणे येथील शेतकरी महेंद्र देशमुख यांनी रविवारी आठ वर्षे वयाच्या छोट्या मुलीसह मातोश्रीमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन खेरवाडी पोलिस ठाण्यात नेले असता मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने पोलिसांनी सोडून दिले. या शेतकऱ्याने बॅंकेने आपल्यावर अन्याय केल्याचे बोलत सोमवारी सकाळी कुटुंबासह पनवेल तहसील कार्यालयामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्याला अडवले. देशमुख यांनी कुठल्याही प्रकारचे कर्ज घेतलेले नसताना बॅंकेने त्यांच्या कायम ठेवीमधून कर्जाचे हप्ते वसूल केल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
ही बातमी वाचा - किक बसण्यासाठी कफ सिरपचा वापर वाढतोय
2006 मध्ये आठ लाखांचे कर्ज घेतले असल्याचे बॅंकेचे म्हणणे आहे. त्यानंतर 2009 मध्ये बॅंकेने माझे घर तारण घेऊन त्यावर बॅंकेचा बोजा चढवला आहे. एक तर मी बॅंकेकडून कुठल्याही प्रकारचे कर्ज घेतले नाही व बॅंकेने माझ्या कायम ठेवीमधून आठ लाख रुपये कर्जाची वसुली केली आहे. याचा जाब विचारण्यासाठी मी शासनदरबारी आल्याचे देशमुख यांनी सांगितले. यादरम्यान बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी आपल्याला व आपल्या कुटुंबाला धमकावले, असेही माध्यमांशी बोलताना सांगितले. जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही, तोपर्यंत सहकुटुंब हा लढा चालू ठेवणार असल्याचे शेतकऱ्याने सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.