मुंबई

मुंबई विमानतळावर होणार जलद कोरोना चाचणी, वाचा किती तासात मिळणार रिपोर्ट

प्रशांत कांबळे

मुंबई: मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (सीएसएमआयए)उतरणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणीचा निकाल जलद  मिळणे शक्य होणार आहे. विमानतळ प्रशासनाने यासाठी पुण्याच्या माय लॅब डिस्कवरी सोल्युशन्स या संदर्भात करार केला आहे. या सुविधेमुळे विमानतळावर चाचणीच्या निकालासाठी प्रवाशांना अडकून राहावे लागणार नाही, तसेच विमानतळावरील प्रवाशांची गर्दी कमी होण्यास मदत मिळणार आहे. 

विमानतळ प्रशासनाने मायलाब डिस्कवरी सोल्यूशन्सला आरटी-पीसीआर चाचणीसाठी काउंटर उभारण्याासाठी आणि नमुने तपासणीसाठी जागा दिली आहे. या अंतर्गत प्रवाशांची कोरोना चाचणी केल्यानंतर  काही तासात  प्रवाशांना कोरोना चाचणीचा निकाल मिळणार आहे. यासाठी आंतराष्ट्रीय आणि आंतरदेशीय प्रवाशांसाठी काऊंटर उघडण्यात आले आहे. 

22 फेब्रुवारीपासून मायलाब डिस्कवरी सोल्यूशन्सने ही सुविधा सुरू केली आहे. चाचणीसाठी 850 रुपये असा दर ठेवण्यात आला असून, आठ तासात प्रवाशांना  निकाल देण्याचा प्रयत्न कंपनीकडून केला जात आहे. 

एकूण 30 चाचणी काऊउंटर

सध्या विमानतळावर तीन खासगी कंपन्यांनी कोरोना चाचणी सुविधा उपलब्ध आहे. यामध्ये मेट्रोपॉलिस हेल्थकेअर, सबअर्बन डायग्नोस्टिक्स आणि लाईफीनीटी वेलनेस या कंपन्यांच्या टेस्टिग सुविधा आहेत. या तिन्ही कंपन्यांनी प्रवाशांच्या चाचणीसाठी 30 काऊंटर उभारली आहे. यामध्ये आंतराष्ट्रीय प्रवाशांसाठी 12 तर आंतरदेशीय प्रवाशांसाठी 18 काऊंटर उभारण्यात आली आहे. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना जलद कोरोना चाचणीसाठी 4500 रुपये मोजावे लागतात. मात्र ही चाचणी अचूक आणि जलद आहे,  अशी माहिती  प्रवक्त्यांनी दिली.

--------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Fast corona tests Mumbai airport Test results will available eight hours

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 2nd Test Live: आकाश दीपची सामन्यातून माघार... टीम इंडियाने Live मॅचमध्ये बदलला संघ; मोहम्मद सिराजला पुन्हा ठेंगा, मग कोणाला दिली संधी?

Sugarcane Weighing Fraud : राज्यातील ऊस उत्पादक ‘काटामारी’च्या चरख्यात ,शेतकऱ्यांची २६०० कोटी रुपयांची लूट; बळिराजाला हक्काचे पैसे देण्याची मागणी

E Rickshaw Charging Point Fire : ई-रिक्षाच्या चार्जिंग पॉइंटमधून आग लागली?; एकाच घरातील चार जणांचा मृत्यू

Maharashtra weather Forecast : राज्यात पुन्हा हुडहुडी ! डिसेंबरच्या सुरुवातीला थंडीचा जोर वाढणार; आज तुमच्या भागात कसे असेल हवामान? जाणून घ्या

IND vs NZ 2nd Test Live: 'ध्रुव' तारा! जुरेलच्या जिद्दीसमोर न्यूझीलंडने मानली हार; शतक हुकले, पण सामन्याचे चित्र एकदम बदलले, ७ बाद ११७ धावांवरून भारत...

SCROLL FOR NEXT