Uddhav Thackeray Sakal
मुंबई

ShivSena: शिवसेना पदाधिकाऱ्यावर हल्ला; उद्धव ठाकरेंचा फोन अन् दिला 'हा' इशारा

नंतर वचपा काढू असं म्हणत दिला दिलासा

सकाळ डिजिटल टीम

कल्याण : कल्याण येथील शिवसेना उपशहर प्रमुख हर्षवर्धन पलांडे यांच्यावर काही अज्ञात लोकांनी तलावर आणि चॉपरनं हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः पलांडे यांना फोन करुन त्यांची विचारपूस केली. तसेच आपण या घटनेचा वचपा नंतर घेऊ आता बरे व्हा, अशा शब्दांत त्यांना दिलासा दिला. (Fatal attack on Shiv Sena office bearer Harshwardhan Palande)

हल्ल्यात पलांडे यांच्या हाताला दुखापत झाली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या दोन बोटांना गंभीर दुखापत झाली असून मारेकऱ्याचा हातातील चॉपर अडवताना ही दुखापत झाल्याचं त्यांनी सांगितलं. शिवसेनेनं काम कसं करतोस? असं म्हणत मारेकऱ्यांनी रॉड, चॉपर आणि तलावारीनं मारहाण केल्याचं पलांडे यांनी सांगितलं.

उद्धव ठाकरे आणि हवर्षवर्धन पलांडे यांच्यात फोनवरुन असा झाला संवाद

उद्धव ठाकरे - हॅलो!

पलांडे - जय महाराष्ट्र.

ठाकरे- कसा आहेस आता?

पलांडे - हल्ला केला माझ्यावर, तू शिवसेनेचं काम कसा करतोस? तेच बघतो असं ते म्हणाले.

ठाकरे - आता जास्त बोलू नका, बरे आहात ना? व्यवस्थित आहात ना?

पलांडे - वाचलो पळालो....काय करणार!!

ठाकरे - याचा वचपा आपण काढू नंतर....पहिलं व्यवस्थित व्हा.

पलांडे - आम्ही काही घाबरत नाही. आम्ही खंबीर आहोत, तुमच्यासोबत आहोत. काही टेन्शन नाही.

ठाकरे - मी पण येईन तिकडे

पलांडे - तुमचा आशीर्वाद राहू द्या फक्त आम्ही बघतो काय करायचं ते...जय महाराष्ट्र.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Corporation Election 2026 Voting LIVE Updates : प्रभाग १७ मध्ये भाजप उमेदवाराच्या गाडीत रोख रक्कम आढळली

Kolhapur Mumbai Duronto Express : कोल्हापूरहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना आणखी एक रेल्वे मंजूर, दुरांतो एक्स्प्रेस होणार सुरू

Niti Ayog : डोंगर सर केला! निर्यातीत उत्तराखंड देशात नंबर १; CM धामींनी जनतेला दिले विजयाचे श्रेय

मित्राच्या लग्नात रणबीर आलियाचा भन्नाट डान्स, ढोलाच्या तालावर लगावले ठुमके, Viral Video एकदा बघाच

Sangli Theft : गायी-म्हशी चोरीचा सुळसुळाट; सांगली सीमाभागात नाकाबंदी आणि सीसीटीव्हीची जोरदार मागणी

SCROLL FOR NEXT