Father and son beat up the salesman in medical store in dombivli Marathi Crime News  
मुंबई

Dombivli Crime : झोपेची गोळी दिली नाही; मेडिकलमधील विक्रेत्याला पिता पुत्राची मारहाण

Dombivli Crime News: याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक गणेश मुसळे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली, ता. 26 - मेडिकल स्टोअरमध्ये विक्रेत्याकडे झोपेची गोळी त्यांनी मागितली. मात्र दुकानात झोपेची गोळी नाही असे विक्रेत्याने सांगताच याचा राग आल्याने पिता पुत्रांनी मेडिकल मधील विक्रेत्याला बेदम मारहाण केल्याची घटना खोणी पलावा येथे घडली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात मेडिकल मधील विक्रेता अजय स्वामी (वय 32) यांच्या तक्रारीवरुन दिपक करोडिया (वय 54) व त्यांचा मुलगा दर्शन करोडीया (वय 32) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिपक हे खोणी पलावा फेज 2 मध्ये लेकसाईड मध्ये राहण्यास आहेत. लेकशोर ग्रीन मधील संजीवनी मेडिकलमध्ये सोमवारी रात्री 10.30 च्या सुमारास दिपक हे मुलासह हे गेले होते. दुकान बंद करण्याची वेळ झाली होती. तेवढ्यात तेथे काम करणाऱ्या अजय यांच्याकडे दिपक यांनी झोपेची गोळी मागितली. त्यांच्याजवळ डॉक्टरांची औषधाची चिठ्ठी नव्हती, तरीही ते गोळी मागत होते. यावेळी अजय याने दुकानात झोपेची गोळी नाही असे सांगितले.

याचा राग दिपक यांना आल्याने त्यांनी अजयला शिविगाळ करत हाताच्या चापटीने मारहाण केली. त्यानंतर दिपक व दर्शनने दुकानात शिरुन तेथे असलेल्या वायपरने अजयला बेदम मारहाण केली. या मारहाणीत अजय यांना दुखापत झाली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक गणेश मुसळे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT