मुंबई

VIDEO : बेस्ट चालकाने मुलासह ट्रेनसमोर मारली उडी, मुलगा बचावला

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या डेक्नन एक्सप्रेससमोर (deccan express) सहा वर्षाच्या मुलाहस उडी मारुन वडीलांनी आत्महत्येचा प्रयत्न (suicide attempt) केल्याची हृदयद्रावक घटना विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात (vitthalwadi railway station) घडली. या अपघातात वडीलांचा जागीच मृत्यु (father death) झाला असला तरी सहा वर्षाचा चिमुरडा मात्र यातून सुखरुप बचावला आहे. प्रमोद आंधळे असे मृत व्यक्तीचे नाव असून हे बेस्टमध्ये चालक म्हणून नोकरी करत होते.

उल्हासनगरमधील शांतिनगर परिसरात प्रमोद आंधळे हे पत्नी व दोन मुलांसह राहण्यास होते. बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ते आपल्या सहा वर्षाचा मुलगा स्वराज याच्यासह विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात आले होते. यावेळी मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणारी डेक्कन एक्सप्रेस विठ्ठलवाडी स्थानकातून पास होत असताना काही क्षणाच्या अवधीतच प्रमोद यांनी मुलासह स्वतःला गाडीच्या समोर झोकून दिले.

स्थानकातील प्रवाशांनाही एका सेकंदासाठी काय झाले ते कळले नाही. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. प्रमोद यांचा रेल्वे खाली सापडल्याने जागीच मृत्यु झाला होता, तर स्वराज हा ट्रॅकमधून बाहेर पडल्याने तो या अपघातातून आश्चर्यकारक रित्या बचावला आहे. प्रमोद यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी रेल्वे पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे. प्रमोद हे बेस्टमध्ये चालक म्हणून नोकरी करत होते. प्रमोद यांनी मुलासह आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला ? असा प्रश्न उपस्थित होत असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Singapore Airlines: लंडनहून सिंगापूरला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये टर्ब्युलन्समुळे एका प्रवाशाचा मृत्यू, तर अनेक जण जखमी

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी सपाट बंद; निफ्टीचा मिडकॅप निर्देशांक प्रथमच 52,000च्या वर, कोणते शेअर्स चमकले?

Brij Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहचा पाय खोलात! कोर्टानं ७ विविध कलमांतर्गत केली आरोप निश्चिती

Blackout Teaser Out: "वक्त बदलने वाला है!"; '12 वी फेल' फेम विक्रांतच्या 'ब्लॅकआऊट'चा जबरदस्त टीझर रिलीज

HSC Result : पत्रकार व्हायचंय? 12वी नंतर काय कराल? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT