मुंबई

विमानप्रवास नको रे बाबा! कोरोना संसर्गाची दहशत कायम...

सकाळ वृत्तसेवा


मुंबई : विमान प्रवासादरम्यान अर्ध्यापेक्षा अधिक प्रवासी कोविड-19 च्या नियमांचे पालन करत नाही. त्यामुळे जवळपास 31 टक्के प्रवाशांना विमानाने प्रवास करणे जोखमीचे वाटत आहे. तर 24 टक्के प्रवाशांना आपल्याला विमान प्रवासातून कोरोनाची बाधा होण्याची भिती वाटते. काही खासगी कंपन्यांनी जुन मध्ये केलेल्या सर्वेक्षणात ही माहिती पुढे आली आहे.

विमान प्रवास सेवा देण्यासाठी  ‘एयर विस्टारा’ने जुन महिन्यात या संदर्भात एक सर्वे केला होता. यामध्ये  विविध वयोगटातील 6000 प्रवाशांना त्यांची मते विचारण्यात आली होती. 
या सर्वेक्षणात असे दिसून आले की, कोरोना विषाणूची भिती वाटणाऱ्या प्रवाशांची संख्या 46 टक्क्यापेक्षा जास्त आहे ; तर 24 टक्के प्रवाशांना विमानतळावरील चेक-इन, सेक्युरीटीच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो अस वाटते. तर 11 टक्के प्रवाशांना बोर्डींग, डिबोर्डींग दरम्यान कोरोनाची बाधा होईल अशी भिती आहे.

विस्टाराने  या प्रवाशांना आपण कधी विमान प्रवास करू शकता असे विचारल्यास 41 टक्के प्रवाशांनी एक महिन्यानंतर विमान प्रवास करणार असल्याचे सांगितले. 65 टक्के प्रवाशांनी पुढल्या सहा महिन्यानंतरच विमान प्रवास करणार असल्याचे म्हटले आहे. केवळ  20 टक्के प्रवाशांनी परदेशी प्रवास करण्याचे ठरवले आहे. अमेरीका आणि थायलंड नंतर यामध्ये 13 टक्के प्रवाशांनी सिंगापूर, 11 टक्के प्रवाशांनी ग्रेट ब्रिटेन तर 10 टक्के प्रवाशांनी दुबईची निवड केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: चेन्नई सुपर किंग्सचे अंतिम ४ मध्ये पोहोचणे अवघड! लखनौ सुपर जायंट्सने स्वतःसह त्यांची पण वाट लावली...

महाराष्ट्रात मालमत्ता वादांवर लगाम लागणार! मोजणीशिवाय आता होणार नाही म्युटेशन; फ्लॅटधारकांनाही प्रॉपर्टी कार्ड मिळणार

Police Officer Transfers : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या! संजय दराडे पुण्याचे सह पोलिस आयुक्त तर गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्तपदी तेजस्वी सातपुते

LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्स एका फटक्यात तीन संघांचा कार्यक्रम करणार; एक गणित ज्याने भल्याभल्यांची झोप उडणार

Mumbai News : गुगल बरोबर ॲपललाही नोटीस; बाईक टॅक्सी सेवेला झटका, राज्य सायबर विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT