मुंबई

भय इथले संपत नाही! आरोग्य विम्याकडे नागरिकांचा कल वाढला... वाचा सविस्तर माहिती

सकाळ वृत्तसेवा


मुंबई : लॉकडाऊनचा सर्वच क्षेत्राला फटका बसला. विमा क्षेत्रही यातून सुटले नाही. लॉकडाऊनमुळे वाहन विक्रीला ब्रेक लागल्याने मोटार विमा काढणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे; मात्र याच काळात कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे आरोग्य विमा काढण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. आरोग्य विमा काढणाऱ्यांचे प्रमाण 30 वरुन 36 टक्क्यांपर्यंत आले आहे.

देशात जीवन विमा वगळता इतर विमा क्षेत्रात आतापर्यंत वाहन क्षेत्राचा वाटा 37 टक्के; तर आरोग्य विमा क्षेत्राचा वाटा 26 टक्के होता. मात्र, एप्रिल-जून या काळात मोटर विमा क्षेत्राचा वाटा 37 टक्क्यांवरुन 26 टक्क्यांपर्यंत घसरला आहे. आरोग्य विमा काढणाऱ्यांचे प्रमाण या काळात वाढून 36 टक्के झाला आहे. गेल्या वर्षी देशाच्या एकूण विमा बाजारात आरोग्य क्षेत्राचा वाटा 30 टक्के होता.   एप्रिल- मे या महिन्यात आरोग्य विम्याच्या प्रिमियमच्या माध्यमातून कंपन्यांना 9 हजार 122 कोटीचे उत्पन्न मिळाले. गेल्या वर्षी याच महिन्यात 8 हजार 484 कोटी एवढी कमाई झाली होती; मात्र या काळात  मोटर विमा काढणाऱ्यांचे प्रमाण चांगलेच घसरले आहे. एप्रिल-मे महिन्यात मोटर वाहनाच्या प्रिमियमपोटी कंपन्यांना 6 हजार 753 कोटी मिळाले.  गेल्या वर्षी याच महिन्यात हे उत्पन्न 10 हजार 511 कोटी रुपये एवढे होते. 

कारविक्री ठप्प
लॉकडाऊनच्या काळात कार विक्रीमध्ये मोठी घसरण झाली होती. एप्रिल महिन्यात देशात एकही कार विकली गेली नव्हती. तसेच, एप्रिल, जून या महिन्यांत कार विक्रीमध्ये 75 टक्के घट झाली होती. त्याचा हा परिणाम असल्याचे जनलर इश्युरन्स कौऊन्सीलचे म्हणणे आहे.  2019-20 या वर्षात मोटर विमा प्रिमियमच्या माध्यमातून कंपन्यांनी 69,208 रुपयाचा महसूल मिळवला होता; तर आरोग्य विम्यामधून 51,637 कोटी रुपये कमावले होते. 

विमा योजनेत कोव्हिडचा समावेश
इतर क्षेत्रातील विम्याचे प्रमाण कमी होत असताना कोरोना संसर्गाच्या भीतीने आरोग्य विमा काढणाऱ्यांच्या प्रमाणात अचानक वाढ झाली आहे. येत्या काही महिन्यांत आरोग्य विमा काढणाऱ्यांचे प्रमाण जलद गतीने वाढणार असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. लॉकडाऊनमध्ये अनेक विमा कंपन्यांनी कोरोना कवच नावाने विमा योजना बाजारात उतरवल्या आहेत. जवळपास 30 जनरल विमा कंपन्यांनी आपल्या विमा योजनेत कोव्हिड 19 चा समावेश केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

Nasrapur Case Verdict: नसरापूर अत्याचार प्रकरणात शिक्षा जाहीर; भीमराव कांबळेला फाशी की जन्मठेप यावर निर्णय?

Gangapur Fraud : गंगापूरमध्ये खोट्या भीतीचा डाव; पतीच्या संबंधाचे खोटे आमिष दाखवून विवाहितेची पाच लाखांची लूट

Pune Nashik Highway Crash: पुणे-नाशिक महामार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात; आयटी अभियंत्याचा मृत्यू, पत्नींसह सात जखमी

SCROLL FOR NEXT