मुंबई

परप्रांतीय मजुरांना सतावतेय कर्जबाजारी होण्याची भीती 

सकाळ न्यूज नेटवर्क

मानखुर्द : मुंबई महापालिकेच्या विविध विकासकामांसाठी काम करणाऱ्या मजुरांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. हाताला काम नाही त्यामुळे रोजंदारी बंद आहे. कंत्राटदारही त्यांच्याकडे दुर्लक्ष रीत आहे. या कठिण परिस्थितीत कर्जबाजारी होण्याची भीती या मजुरांना सतावत आहे. 

मानखुर्द-गोवंडी परिसरात पालिकेकडून विविध विकासकामे मागील काही काळापासून सुरु आहेत. या कामाची कंत्राटे खासगी कंत्राटदारांना देण्यात आली असून त्यांच्याकडे परप्रांतीय मजूर रोजंदारीवर काम करीत होते. पालिकेने कंत्राटी कामगारांना राहण्यासाठी तात्पुरत्या निवासाची व्यवस्था कामाच्या ठिकाणापासून जवळच केली आहे. सुमारे ३५ मजूर याठिकाणी सध्या राहत आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशभर संचारबंदी लागू झाल्यापासून मजूरांचा पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्या कंत्राटदाराकडे ते काम करत होते. त्यांनीही त्यांच्याकडे दूर्लक्ष केले आहे. कंत्राटदारांनी मदत करण्याऐवजी पुढील कामाच्या रोजंदारीची उचल दिली आहे. त्यांच्याकडे असलेल्या जीवनाश्यक वस्तूंचा साठादेखील पुढील काही दिवसात संपेल. त्यानंतर जगायचे कसे हा प्रश्न मजुरांसमोर उभा राहिला आहे.

आता आगाऊ देण्यात आलेली रक्कम काम सुरु झाल्यानंतर रोजंदारीतून कापण्यात येणार आहे. आधीच तुटपुंज्या कमाईत स्वतःच्या पोटाला चिमटा काढून जगणाऱ्या मजूरांवर कर्जाचा डोंगर उभा राहणार आहे. गावी असलेले कुटुंबियांची काळजीदेखील सतावत असल्याने लवकरात लवकर रेल्वेसेवा पुन्हा सुरु व्हाव्यात व गावी जाता यावे अशी प्रार्थना ते करत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : उल्हासनगरहून विजय मेळाव्यासाठी कार्यकर्ते रवाना

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

'या' चित्रपटाआधी भारतात नव्हतं संतोषी माताचं मंदिर, सिनेमा आला अन् सुरु झाले व्रत-उपास! चित्रपट पाहण्यासाठी चप्पल काढून जायचे प्रेक्षक

D Gukesh: ज्या कार्लसनने 'कमजोर' म्हणून हिणवलं, त्याच्याच नाकावर टिच्चून गुकेशनं 'रॅपिड' स्पर्धेचं जेतेपद जिंकलं

Nagpur News: ऐकावं ते नवलच! मृत व्यक्तीला दिलं रहिवासी प्रमाणपत्र; वाडी नगरपरिषदेच्या कारभारावर गंभीर प्रश्न

SCROLL FOR NEXT