मुंबई

सायन-पनवेल महामार्गावर दुचाकीस्वारांची धूम; लेन पाळत नसल्याने मोठ्या अपघाताची भिती

प्रशांत कांबळे

मुंबई  ः  सायन - पनवेल महामार्गावर वाहतुक नियमांची पायमल्ली करत दररोज दुचाकीस्वार धुम ठोकत आहे. त्यामूळे अवजड वाहनांसह चारचाकी वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतो आहे. दुचाकीस्वार अचानक गाडीपुढे येऊन वाहनांना ओव्हरटेक करत असल्याने महामार्गावर मोठा अपघात होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. 

युवकांमध्ये सध्या स्पोर्ट्स दुचाकीची क्रेज दिसून येत आहे. याच दुचाकी कार्यालयीन, महाविद्याल किंवा पर्यटनासाठी सुद्धा वापरल्या जात आहे. मात्र, महामार्गावरील लेनचे नियम न पाळताच वाहनांना ओव्हरटेक करून पुढे जाण्याची शर्यतच दिसून येत आहे. गेल्या वर्षात राज्यातील एकूण अपघातांच्या तुलेनेत 45 टक्के अपघात दुचाकीस्वारांच्या ओव्हरटेकमूळे झाल्याचे महामार्ग पोलीसांनी सांगितले आहे. मात्र, तरीही दुचाकीस्वारांकडून नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून येत आहे.  

सायन -पनवेल महामार्गावर महामार्ग पोलीसांकडून या दुचाकीस्वारांवर वेळीवेळी कारवाई केली जात असल्य़ाचे महामार्ग पोलीसांनी सांगितले आहे. मात्र, महामार्गावरील वाहतूकीचे नियम तोडून सुसाट वेगाने धुम ठोकणाऱ्या दुचाकीस्वारांमध्ये कुठलीही भिती नसल्याचे दिसते आहे. जानेवारी ते नोव्हेंबर या दरम्यान 136 अपघात झाले असून, 63 नागरिकांचा मृत्यु झाला आहे. तर 54 गंभीर जखमी झाले आहे. तर 13 किरकोळ गंभीर झाले आहे. त्यासोबतच 41 घटना कोणतीही जखम न झालेले अपघात सुद्धा झाले असल्याची माहिती महामार्ग  पोलीस विभागाने दिली आहे. 

Fear of major accident due to non observance of two wheeler lane on Sion-Panvel highway

-------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly election results 2026 Live Update: तामिळनाडूत मोठा राजकीय उलटफेर, विजयच्या TVK चं शतक

Infrastructure Success: ऋतुजा नागटिळक-ढोक ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पात चमकली; जगातील लांब बोगदा प्रकल्पात महत्त्वाची भूमिका, बहुराष्ट्रीय कंपनीत मॅनेजर!

Chhatrapati Sambhajinagar: अफवांमुळे गॅस बुकिंगसाठी ग्राहकांची ऑनलाइन झुंबड;सोशल मीडियावर फिरताहेत दरवाढीचे मेसेज

IPL 2026: हार्दिक, सूर्यकुमारच्या फॉर्मवर लक्ष; मुंबई लखनौमध्ये आज लढत, तळाच्या संघांमध्ये झुंज, पाहा कशी असेल Playing XI

PAN Rule: आता या कामांसाठी PAN कार्ड बंधनकारक! Form 60 बंद, Form 97 लागू; जाणून घ्या पॅनचे नवे नियम

SCROLL FOR NEXT