mumbai sakal
मुंबई

पुन्हा निर्बंधांची धास्ती; नव्या व्हेरिएंटमुळे नियम आणखी कठोर

सार्वजनिक वाहतुकीसाठी दोन डोस बंधनकारक

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : दीड वर्षांपासून अवघ्या जगाला वेठीस धरणारा कोरोना विषाणूचा संसर्ग आता कुठे आटोक्यात येत असल्याचे दिसत असतानाच दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ओमीक्रोन या नव्या व्हेरिएंटमुळे पुन्हा संपूर्ण जगाला धडकी भरली आहे. शुक्रवारी (ता. २६) जागतिक आरोग्य संघटनेने या विषाणूबद्दल चिंता व्यक्त करताच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीची बैठक घेऊन आरोग्य मंत्रालयाला सज्ज राहण्याच्या सूचना केल्या; राज्य सरकारनेदेखील संसर्ग रोखण्यासाठी नियम आणखी कठोर करत नागरिकांना या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

नियम तोडणाऱ्यांकडून जबर दंड वसूल केला जाणार आहे. राज्य सरकारच्या नवीन नियमावलीनुसार, दोन डोस घेतलेल्या नागरिकांनाच आता सार्वजनिक वाहतुकीचा वापर करता येणार आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील आज सर्व जिल्हे, महापालिका प्रशासनाची तातडीने बैठक बोलावून त्यांना सज्ज राहण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे किमान यंदा तरी डिसेंबरमधील ख्रिसमस आणि नववर्ष उत्साहात साजरे करण्याच्या नागरिकांच्या अपेक्षेवर चिंतेची गडद छाया पसरली आहे.

राज्य सरकारचे नवे नियम

  1. मुंबईतील लोकल ट्रेनप्रमाणे एसटी, बससेवा, टॅक्सी, रिक्षातून प्रवास करायचा असेल तर दोन डोस घेतलेल्यांनाच परवानगी

  2. कोरोनाचे नियम न पाळणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार

  3. रिक्षा, टॅक्सीतील प्रवाशाला मास्क नसेल तर ५०० रुपये आणि रिक्षा-टॅक्सी चालकालाही ५०० रुपये दंड

  4. दुकानात आलेल्या ग्राहकाने मास्क घातला नसेल तर ग्राहकाला ५००, तर दुकानदाराला १० हजार रुपये दंड

  5. मॉलमध्ये ग्राहकांच्या चेहऱ्यावर मास्क नसेल तर मालकाला तब्बल ५० हजार रुपयांचा दंड. वारंवार असा प्रकार घडत असल्यास मॉल, दुकान, सभागृह सील करण्यात येतील.

  6. नियम पाळत राजकीय सभा, जाहीर कार्यक्रम घेता येणार,

  7. नियम न पाळणाऱ्या आयोजकाला ५० हजार रुपयांचा दंड

  8. आंतरराष्ट्रीय, देशांतर्गत प्रवास करणाऱ्यांचे लसीकरण आवश्यक. ७२ तास अगोदरचे आरटीपीसीआर चाचणी प्रमाणपत्र सक्तीचे

  9. बंदिस्त सभागृहात होणारे लग्नसोहळे, सिनेमागृह, नाट्यगृह तसेच इतर कोणत्याही कार्यक्रमांना आसन क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीची परवानगी.

  10. खासगी वाहनांमधून प्रवास करण्यासाठी दोन डोसची अट नसेल.

देशभर

  1. गुजरात सरकारकडून नवी नियामवली जारी

  2. मुंबईत येणाऱ्या प्रवाशांच्या चाचण्या होणार

  3. मध्य प्रदेश सरकारचाही चाचण्यांवर भर

  4. केरळमध्ये यंत्रणेला सावधगिरीचे निर्देश

  5. दिल्लीत सरकारी कार्यालयांत नियमांची सक्ती

  6. कर्नाटकमध्ये

  7. ४८ विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा कहर! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन; दिला सतर्कतेचा इशारा

Nagpur Vidhan Bhavan Project: नागपूर विधानभवनाचे रूपडे पालटणार; १,००० कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प, दोन्ही सभागृह येणार एकाच छताखाली

Latest Marathi Live Update : लोणावळ्या कडे जाणाऱ्या रोडवर दरड कोसळली, कातळ धबधबा शेजारची घटना

Maharashtra Rain: पालघरमध्ये मुसळधार! 24 तासांत 134 मिमी पाऊस, जनजीवन विस्कळीत; वाहतूक ठप्प

Navi Mumbai: बटाटावड्यात आढळली अळी, नवी मुंबई महापालिकेच्या भोजनालयातील प्रकार

SCROLL FOR NEXT