Thane feriwala News  sakal
मुंबई

Thane News: फेरीवाल्यांची मुजोरी सुरुच; आता चक्क सहाय्यक आयुक्तांसोबत घातला वाद

Diva News: सहाय्यक आयुक्तांशी फेरीवाल्यांची बाचाबाची; कारवाईच्या वेळी तणाव

सकाळ वृत्तसेवा

Diva News

काल संध्याकाळी दिवा मुंब्रा देवी कॉलनी येथे फेरीवाल्यांवर कारवाई दरम्यान दिवा सहाय्यक आयुक्तांसोबत दोन फेरीवाल्यांची बाचाबाची झाली. त्यानंतर त्या दोघांवर दिवा पोलीस चौकीत (Diva Police Station)गुन्हा दाखल करण्यात आला.

दिवा स्टेशन परिसर आणि मुंब्रा देवी कॉलनी रोड परिसरात काल संध्याकाळी 6 ते 9 या वेळी दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त अक्षय गुडधे यांनी कारवाई केली. या कारवाई दरम्यान दोन फेरीवाले आणि आयुक्तांमध्ये बाचाबाची झाली. त्यांच्यावर दिवा पोलीस चौकीत रितसर अतिक्रमण विभाग कर्मचारी सुहास रोकडे यांच्याकडून तक्रार नोंदवली गेली आहे.

या कारवाई नंतर जे फेरीवाले गाड्या लावतील त्यांच्या गाड्या जप्त करुन तेथेच तोडल्या जातील. अशी दंडात्मक कारवाई सर्व फेरीवाल्या गाड्यांवर केली जाईल, असे काल आयुक्तांनी स्पष्ट केले. काल पासून पूर्ण दिव्यात कारवाईला जोमाने सुरुवात झालेली आहे.

याआधी ही ठाण्यातील माजिवडा येथे फेरीवाल्यांवरील कारवाई दरम्यान कल्पिता पिंपळे यांच्यावर हल्ला झाला होता, तर दिवा प्रभाग समितीतील सहाय्यक आयुक्त अलका खैर आणि पालिका कर्मचारी प्रवीण शिंदे यांच्यावरही हल्ला झाला होता. फेरीवाल्यांची मजोरी दिवसेंदिवस वाढतच असताना कारवाई दरम्यान बऱ्याच फेरीवाल्यांनी पालिकेला मज्जाव केला.

संध्याकाळी दिवा स्टेशन परिसर आणि मुंब्रा देवी कॉलनी येथे फेरीवाल्यांना मूळे गर्दी होऊन वाहतूक कोंडी होत असल्याच्या नागरिकांकडून आलेल्या तक्रारींमुळे संध्याकाळी गर्दीच्या वेळी ही कारवाई घेण्यात आली.

नागरिकांना स्टेशन परिसर आणि मुंब्रा देवी कॉलनी परिसरात चालायला ही जागा नसते. प्रत्येक फेरीवाला जास्तीत जास्त सामान लावून रस्ता अडवत असतो. ते हटवण्यासाठी कालची कारवाई आयुक्त गुडधे यांनी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Update: LPG कनेक्शनबाबत सरकारची मोठी अपडेट! 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडरवर काय निर्णय?

AI आणि रोबोट्समुळे नोकऱ्या धोक्यात! बिल गेट्स यांना चिंता; ‘ह्यूमन रिजर्व्ड’चा फॉर्म्युला सुचवला, आरक्षणाची मागणी

Pancreatic Cancer Breakthrough: कॅन्सर उपचारात महत्त्वाची बातमी! पॅनक्रियाटिक कॅन्सरविरोधात मोठं यश; नव्या औषधाला FDAची मंजुरी

शिवीगाळ करणाऱ्याला श्वेता तिवारीने शिकवला धडा; शोधून काढत लेखी माफीनामा घेतला

Numerology: गर्दीतही वेगळी ओळख! इतर लोकांपेक्षा वेगळा विचार का करतात 'या' मूलांकाचे लोक? ट्रेंड फॉलो करत नाहीत...

SCROLL FOR NEXT