मुंबई

हा उत्सव आहे हिंदू- मुस्लिम ऐक्याचा प्रतिक

सकाळ वृत्तसेवा

कर्जत : कर्जत तालुक्‍यातील कळंब गावात हजरत शेख अली शाह बाबांचा उरूस नुकताच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हिंदू मुस्लिम ऐक्‍याचा प्रतीक असलेला हा सोहळा पाच पिढ्यापासून परंपरागत पद्धतीने होतो. या निमित्ताने दर्गा परिसरात मोठी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. 

दोन दिवसांच्या या कार्यक्रमात पहिल्या दिवशी बाबांची संदलची ढोल ताश्‍याच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये सर्वधर्मीय सहभागी झाले होते. 
लहान मुलांसाठी हा उरूस खेळण्यांमुळे विशेष ठरतो. खाद्यपदार्थांसाठीही तो प्रसिद्ध आहे. येतील "गवना' या खाद्यपदार्थासाठी खवय्ये गर्दी करतात. गावातील माहेरवाशीनी आवर्जून उपस्तित राहतात. दुसऱ्या दिवशी रात्री कव्वालीचा कार्यक्रम होतो. यामध्ये नामवंत कव्वाल सहभागी होतात. या वेळी देशातील सुप्रसिद्ध गायक अस्लम-अक्रम साबरी दिल्लीवाले आणि कॅसेट किंग अजीम नाजा मुंबई यांचा कव्वालीचा सामना रंगला. हिंदू मुस्लिम ऐक्‍यावर अजीज नाजा या कव्वालने गायलेल्या गाण्याने उपस्थितांची मने जिंकली. 

उरूसात कोणताही अनुचित प्रकार घडूनये यासाठी स्थानिक पोलीस प्रशासन सह उरूस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष काळजी घेतली. उरूस कमिटीचे अध्यक्ष आयुब कोईलकर, उपाध्यक्ष अन्सार लोगडे, सरपंच माधुरी बदे, माजी सरपंच फाईक खान, उपसरपंच राहुल परदेशी, शहनावाज पानसरे, शिवराम बदे यांसह मान्यवर उपस्तित होते.

कळंब गावातील उरूस हिंदू मुस्लिम ऐक्‍याचे प्रतीक आहे. उत्सवात दरवर्षी गर्दी वाढत आहे. हजरत शाह अली बाबांच्या कार्याचा चमत्कार आहे. 
- शिवराम बदे, शिवसेना संघटक,कर्जत 
.................. 
हजरत अली शाह बाबांच्या उरुसाला सुमारे 300 वर्षाची परंपरा आहे. ही परंपरा कळंब ग्रामस्तानी जपली आहे. यामध्ये पंचक्रोशीतील हजारो नागरिक सहभागी होतात. 
- रईस डोंगरे, सदस्य, उत्सव कमेटी 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: EDचं सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र; केजरीवालांना जामीन का देऊ नये? दिली यादी

Yuvraj Singh T20 WC 2024 : रोहितपेक्षा 'या' दिग्गजाच्या गळ्यात असावं वर्ल्डकपचं मेडल... युवराज सिंगनं कोणाचं नाव घेतलं?

CEO K Krithivasan Salary: देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी संभाळणारे के कृतिवासन यांचा पगार किती?

PBKS vs RCB Live Score : आव्हान जिवंत ठेवण्यासाठी दोन्ही संघ लावणार जोर

Dabholkar Murder Case Timeline: नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाचा 10 वर्षांनंतर लागणार निकाल? आतापर्यंत काय घडामोडी घडल्या?

SCROLL FOR NEXT