Fighting between Shivsena and MNS party workers at lower parel bridge 
मुंबई

मुंबईत शिवसेना-मनसे कार्यकर्त्यांमध्ये जुंपली

संतोष मोरे

मुंबई - लोअर परेल पुलाच्या पाहणी दौऱ्या दरम्यान उड्डाणपुलावर शिवसेना आणि मनसेचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. पुलाच्या पाहणी दौऱ्यात मनसे कार्यकर्त्यांनी घुसखोरी केल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. पोलिसांनी मध्यस्थी करुन हे प्रकरण वेळीच शांत केले.

वरळी भागातील शिवसेना आमदार सुनिल शिंदे आणि मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी लोअर परेलच्या उड्डाणपुलावर रेल्वे पालिका अधिकाऱ्यांसह पुलाच्या पाहणीसाठी आले होते. त्यावेळी दोघांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना धक्काबुक्की-शिवीगाळ केल्याची माहिती आहे. त्यानंतर उड्डाणपुलावरच शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला.   

महापालिका, रेल्वे अधिकारी या उड्डाणपुलाची पाहणी करण्यासाठी जाणार होते. त्यावेळी आमदार सुनिल शिंदेही उड्डाणपुलाची पाहणी करण्यासाठी गेले. मात्र अरुंद वाट असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी आपल्या दौऱ्यात घुसखोरी केल्याचा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे.

लोअर परेलचा रेल्वे पूल मंगळवार (24 जुलै) पासून वाहतूक आणि पादचाऱ्यांसाठी बंद करण्यात आला. त्यामुळे लोअर परेल रेल्वे पुलाजवळ नागरिकांची गर्दी होऊन गोंधळाचं वातावरण आहे.
 




आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court Bench : पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरु करण्याची आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

Nimisha Priya: तूर्तास फाशी टळली, आता पुढे काय? जाणून घ्या नेमकं काय आहे येमेनमधील निमिषा प्रिया प्रकरण

Latest Maharashtra News Updates : ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जोडो मारो आंदोलन

Israel attacks Syria: इस्राईलकडून सीरियाच्या मंत्रालयावर हल्ला! लष्कराचे मुख्यालयही टार्गेट; हल्ल्याचं कारण केलं स्पष्ट

Mumbai Railway Station: स्थानकांवरील कामे तत्काळ पूर्ण करा, शिंदेसेना खासदारांचा रेल्वेला आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT