fighting in meera bhainder Municipal corporation  
मुंबई

मीरा भाईंदर महापालिकेत सेना-भाजपमध्ये राडा

संदीप पंडित

भाईंदर : विधानसभा निवडणुकीचा तोंडावर मीरा-भाईंदर महापालिकेमध्ये शिवसेना व भाजपा नगरसेवकांमध्ये वाद शिगेला गेल्याने आज राडा झाला. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली असून याचे परिणाम निवडणुकीत होणार असल्याचे म्हटले जात आहे. आज महापालिकेत स्थायी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कलादालनाच्या विषयाचा समावेश न केल्याने शिवसेनेच्या नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेतला.

यावेळी भर सभागृहात भाजप सेनेच्या नगरसेवकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याने वाद शिगेला गेला. त्यानंतर शिवसेनेच्या नगरसेवकांनी भाजपाच्या स्थानिक आमदाराला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत महापौर कार्यालय, स्थायी समिती सभागृहाची तोडफोड केली.

मीरा-भाईंदर महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक आज बोलवण्यात आली होती. या बैठकीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कला दालन आणि प्रमोद महाजन सभागृहाच्या विषयावर चर्चा करण्यात यावी अशी मागणी वारंवार करण्यात येत आहे. आज  स्थायी समितीच्या बैठकीत या विषयावर चर्चा होणार होती. मात्र, आजही कला दालनाचा विषय नसल्याने शिवसेनेच्या नगरसेवकांनी बैठकीत गोंधळ घालण्यास सुरूवात केली.

स्थानिक आमदार नरेंद्र मेहता हे यात आडकाठी आणत असल्याचा आरोप शिवसेने केला. त्यानंतर मेहता यांना शिवीगाळ करत शिवसेना नगरसेवकांनी स्थायी समिती सभागृह, महापौर कार्यालयात तोडफोड केली. यावेळी सभागृहाच्या काचा तोडण्यात आल्या तसेच खुर्च्या फेकून घोषणाबाजी करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Dare Village : गावी आलो किंवा लंडनला गेलो तरी पोटदुखी, “ विरोधकांना कामातून उत्तर देईन”,एकनाथ शिंदेंनी दरेतून साधला निशाणा

रोहित शर्माचा Mumbai Indians मधील 'सहकारी' Ajit Agarkar ची जागा घेणार; आता हिटमॅन २०२७ चा वर्ल्ड कप खेळणारच...

सगळं सोडून द्यायचा विचार होता पण...; सुटकेनंतर संतोष पंडित काय म्हणाले? तुरुंगातल्या व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

Panvel News: पनवेलमध्ये वाहतुकीत मोठे बदल! गणरायाच्या विसर्जन मिरवणुकांसाठी प्रशासनाचे कडक पाऊल

SCROLL FOR NEXT