मुंबई

परीक्षा होणार...विद्यार्थ्यांनो, अभ्यासाला लागा; येथे वाचा अंतिम वेळापत्रक

संजीव भागवत

मुंबई:  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून एप्रिल महिन्यात दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा आयोजित करण्यासाठी शुक्रवारी अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार दहावीच्या लेखी परीक्षा 29 एप्रिल रोजी सुरू होतील आणि त्या 20 मे पर्यंत चालणार आहेत. तर बारावीच्या परीक्षेची सुरुवात 23 एप्रिलला होणार असून ही परीक्षा 21 मेपर्यंत चालणार आहे.

या वेळापत्रकात कोणताही बदल होणार नाही. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांनी या वेळापत्रकाचे नोंद घ्यावी, असे आवाहन राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे.

राज्य शिक्षण मंडळाने दोन आठवड्यापूर्वी दहावी बारावीच्या परीक्षेचे एक संभाव्य वेळापत्रक जाहीर केले होते. या वेळापत्रकाची माहिती मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली होती. यावर पालक विद्यार्थी शिक्षक आणि शाळांच्या काही सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यानंतर शुक्रवारी हे वेळापत्रक अंतिम करण्यात आले असून यामध्ये कोणताही बदल होणार नाही, अशी माहिती डॉ. भोसले यांनी दिली.

दरम्यान, दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा आणि अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर केले जाणार आहे परीक्षेपूर्वी राज्य शिक्षण मंडळाकडून राज्यातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना याची माहिती सविस्तरपणे दिली जाईल असेही मंडळाकडून सांगण्यात आले. शिक्षण मंडळाकडून जाहीर करण्यात आलेले दहावी बारावीचे वेळापत्रक हे  मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.in संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
 
दक्षिण भारतातील काही राज्यांनी कोरोना आणि त्याचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन नववी, दहावी आदी वर्गांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात कोरोना पुन्हा वाढत आहे. ऑनलाईन शिक्षणातून असंख्य विद्यार्थ्यांना आपला अभ्यास पूर्ण करता आला नाही. त्यात एप्रिल महिन्यापर्यंत कोरोना आणि त्याचा प्रादुर्भाव कमी होईल याची शाश्वती देता येणार नाही, अशा स्थितीत दहावी बारावी च्या परीक्षांचे वेळापत्रक अंतिम करण्यात मंडळाकडून घाई करण्यात आली असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेचे अध्यक्ष सुधीर घागस यांनी केला आहे.

----------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Final Timetable 10th and 12th written examinations month of April

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah Rukh Khan FDA Notice : तुकाराम मुंढे शाहरुख खानवर कारवाई करणार? FDA च्या नोटीसीला उत्तर न दिल्याने पुढील प्रक्रिया सुरू

6:30 वाजता WFH करण्यास सांगितलं, 9:30 वाजता Google Meetची लिंक आली अन् अवघ्या 5 मिनिटांत 80 जणांची नोकरी गेली; नक्की काय घडलं?

अकरावीत आईला म्हणाल्या मला रुचीरशीच लग्न करायचंय! मृणाल कुलकर्णी यांनी प्रेमासाठी केलेली बंडखोरी, अशी खुललेली लव्हस्टोरी

Ladki Bahin Yojana Latest Update : 1 कोटी 66 लाख महिलांची प्रतीक्षा संपणार! लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता 'या' दिवशी खात्यात जमा होणार

Latest Marathi News Update : अखेर भुलेश्वर राजाची मुर्ती पुन्हा विराजमान, कार्यकर्त्यांच्या डोळ्यात पाणी

SCROLL FOR NEXT