मुंबई

लिंकअभावी अंतिम वर्षाचे विद्यार्थी चिंतेत; मुंबई विद्यापीठाच्या ढिसाळ कारभाराचा फटका

तेजस वाघमारे


मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्ष आयडॉल परीक्षेला शनिवारपासून (ता.3) सुरुवात होत आहे. यंदा प्रथमच होत असलेल्या ऑनलाईन परीक्षेची लिंक विद्यार्थ्यांना 24 तास अगोदर पाठवणे बंधनकारक आहे. मात्र असे असतानाही अनेक विद्यार्थ्यांना ही लिंक आणि प्रवेशपत्र मिळालेले नाही. चौकशी क्रमांकही बंद असून शंकेचे निरसन होत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. 

मुंबई विद्यापीठाकडून फेरपरीक्षा (एटीकेटी) ऑनलाईन घेण्यात येत आहे. या परीक्षेमध्ये अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू झाली तरी लॉगिन आयडी आणि पासवर्डची लिंक मिळालेली नाही. त्यामुळे ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत होते. त्यातच शनिवारपासून (ता.3) सुरू होत असलेल्या आयडॉलच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनाही याच समस्येला सामोरे जावे लागत आहे. यासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर दिलेल्या चौकशी कक्षाच्या क्रमांकावर दूरध्वनी केला असता, तो बंद असल्याचे आढळून आले. त्यामुळे विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. 

यंदा प्रथमच ऑनलाईन परीक्षा होणार असल्याने विद्यार्थ्यांना सरावासाठी पाठवण्यात येणारी लिंकही अनेक विद्यार्थ्यांना मिळालेली नाही. परीक्षा तोंडावर आली आणि सराव परीक्षेची लिंक तर नाहीच, पण परीक्षेसाठीचा लॉगिन आयडी आणि पासवर्डही मिळाला नसल्याने विद्यार्थी प्रचंड मानसिक तणावाखाली आले आहेत. लिंक मिळाली नाही तर पुन्हा परीक्षा घेण्यात येईल, असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले असले तरी परीक्षेची लिंक न मिळाल्यामुळे आम्हाला मानसिक ताण आला आहे. अखेरच्या क्षणाला किंवा परीक्षा सुरू झाल्यानंतर लिंक मिळाल्यावर आम्हाला वेळेत परीक्षा देता येईल का? अचानक लिंक आल्यास आमचा गोंधळ उडू शकतो. अशा प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या आहेत. परीक्षेचे शुल्क भरण्यास एक दिवस विलंब झाल्यास विद्यापीठाकडून परीक्षा नाकारली जाते. मात्र आता परीक्षा घेण्यात विद्यापीठाकडून घालण्यात येत असलेल्या या गोंधळाला कोणाला जबाबदार धरायचे? असा प्रश्‍न विद्यार्थ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे. 

अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत उडालेल्या गोंधळामध्ये कुलगुरूंनी व्यक्तिगत लक्ष घालून ही समस्या सोडवावी. यासाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींवर तातडीने कारवाई करण्यात यावी. 
- विठ्ठल परब,
मुंबई महानगर सहमंत्री, अभाविप 

काही तांत्रिक कारणास्तव विद्यार्थ्यांना लिंक मिळालेली नाही. ज्यांना लिंक मिळालेली नाही, त्यांची पुन्हा परीक्षा घेण्यात येईल. 
- विनोद माळाळे,
जनसंपर्क अधिकारी, आयडॉल. 

-----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

Rohit Pawar : विधानसभेआधी माझा अरविंद केजरीवाल करतील; आमदार रोहित पवार यांचा खळबळजनक दावा

CSK च्या मिचेलने एक-दोन नाही, तर पकडले तब्बल 5 कॅच अन् IPL मध्ये रचला मोठा विक्रम

Narendra Modi : ''कर्नाटकमध्ये संविधान बदलण्याचा प्रयत्न, परंतु जोपर्यंत मोदी जिवंत आहे तोपर्यंत..'' पंतप्रधान नेमकं काय म्हणाले?

Salman Khan Firing Case : सलमान खान गोळीबार प्रकरणातील चारही आरोपींना मोक्का कोर्टासमोर केलं हजर

SCROLL FOR NEXT