मुंबई

अखेर 'मन्नत' पूर्ण, आर्यन खान तुरुंगातून सुटला

आर्यन आलिशारन रेंज रोव्हर कारमध्ये बसून 'मन्नत'च्या दिशेने रवाना झाला आहे.

दीनानाथ परब

मुंबई: अखेर सुपरस्टार शाहरुख खान (Shahrukh khan) आणि गौरीची 'मन्नत' (Mannat) पूर्ण झाली आहे. तब्बल २७ दिवसानंतर आर्यन खान आर्थररोड कारागृहाबाहेर (Arthurroad jail) आला. आर्यन आलिशान रेंज रोव्हर कारमध्ये बसून 'मन्नत'च्या दिशेने रवाना झाला आहे. कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात (drug case) अटकेत असलेल्या आर्यनला गुरुवारी संध्याकाळी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. अन्य कायदेशीर प्रक्रिया काल वेळेत पूर्ण होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे आर्यनची काल सुटका होऊ शकली नाही.

आज सकाळी आर्थर रोड कारागृह प्रशासनातील अधिकाऱ्यांना आर्यनच्या सुटकेच्या आदेशाची प्रत मिळाली. त्यानंतर प्रक्रिया पूर्ण करुन आर्यन सकाळी ११ च्या सुमारास आर्थर रोड कारागृहाबाहेर आला. शाहरुख सकाळपासून वरळीच्या फोर सिझन हॉटेलमध्ये आहे. आर्यन तुरुंगातून सुटल्यानंतर थेट फोर सिझन हॉटेलमध्ये गेला. तिथे वडिल आणि मुलाची भेट झाली. तिथून आता दोघे मन्नतवर जातील.

आर्यन घरी येणार म्हणून मन्नतवर रोषणाई करण्यात आली आहे. मन्नतबाहेर चाहते मोठ्या संख्येने जमले आहेत. एक जण बैल घेऊन 'मन्नत'च्या बाहेर उभा आहे. 'तुझे देखा तो ये जाना सनम' हे शाहरुखच्या गाजलेल्या 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' चित्रपटातील गाणं वाजवत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayodhya Ram Mandir Donation Scam: राम मंदिर देणगी घोटाळा प्रकरणात खळबळजनक प्रकार उघड, कर्मचाऱ्याने घरात शेणाच्या ढिगाऱ्यात लपवले १० लाख रुपये

INDW vs PAKW: T20 World Cup आज रंगणार सर्वात मोठा थरार! भारत-पाकिस्तान मॅच कधी, कुठे आणि कशी पाहायची? वाचा सविस्तर

ना मुलगा ना मुलगी... 'याच्या' नावावर करणार सगळी संपत्ती; गोविंदा यांच्या पत्नीने पॅपराजींसमोर केला खुलासा!

Crime: गेमिंगचा नाद लय बेकार! पैसे कमवण्याच्या नादात रिक्षाचालकाला सव्वाकोटींचा चुना लागला; नेमकं काय घडलं?

Setu Center Row: लोणी काळभोरचे सेतू केंद्र मांजरीला हलविण्याच्या हालचालींना खासदार डॉ. अमोल कोल्हेंचा तीव्र विरोध

SCROLL FOR NEXT