Balya Mama Mhatre esakal
मुंबई

Balya Mama Mhatre : अखेर खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांच्या मध्यस्थीने भारंगी बाधित रहिवाशांचे उपोषण मागे

ती भिंत 15 फूट तोडणार

नरेश जाधव : सकाळ वृत्तसेवा

खर्डी(ठाणे) : भारंगी नदीपात्रात बांधण्यात आलेल्या भिंतीमुळे व इतर अतिक्रमणामुळे नदीचा नाला अरुंद झाला होता. त्यामुळे 7 जुलैच्या मुसळधार पावसाने या नदीला पूर आला होता. यामुळे नदीपात्रात असलेली भिंत 15 फूट तोडण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन शहापुर नगरपंचायतचे मुख्यकार्यकारी अधिकारी शिवराज गायकवाड यांनी खासदार बाळ्यामामा उर्फ सुरेश म्हात्रे यांच्या मध्यस्थीने दिले होते. भारंगी नदीत आलेल्या पुराने बाधित झालेल्या रहिवाश्यांना दिल्यावर उपोषण मागे घेण्यात आले असं कळंबे ग्राम उपसरपंच अविनाश किरपण यांनी सांगितले.

15 जुलै पासून भारंगी नदीच्या पुरातील बाधित रहिवाशी नदीपात्रात असलेली अनधिकृत बांधकामासहित पात्रातील भिंत तोडण्यात यावी,शासकीय मदत तात्काळ मिळावी व अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी करण्यात यावी यासाठी 15 व 16 जुलै रोजी उपोषणास बसले होते.16 जुलै रोजीखासदार बाळ्यामामा म्हात्रे यांनी भारंगी नदीपात्राची पाहणी करून जिल्हाधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा करून नगरपंचायतच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी व बाधित रहिवाशांची चर्चा करून उपोषण संदर्भात मध्यस्थी करून योग्य तोडगा काढल्याने 16 जुलै रोजी रात्री 11 वाजता बाधित रहिवाशांनी उपोषण मागे घेतले.

यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्यामहिला जिल्हाध्यक्ष रश्मीताई निमसे,राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला जिल्हाध्यक्ष विध्याताई वेखंडे,कळंबे ग्राप उपसरपंच अविनाश किरपण, सामाजिक कार्यकर्ते संतोष शिंदे व स्वप्नील भोईर यांच्यासह बाधित रहिवाशिव राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shirdi Saibaba Darshan: विधानसभा निकालापूर्वी विजय थालापतीचे साईदर्शन; शिर्डीत चाहत्यांच्या प्रचंड गर्दीत संस्मरणीय भेट

बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करणार? विधानपरिषदेचा अर्ज भरण्याची शक्यता

Kolhapur Ratnagiri Highway Delay : रत्नागिरी-कोल्हापूर महामार्ग रखडला, पुलांची कामे थांबली; शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यात कामांना मिळेना गती

Happy Birthday Rohit Sharma: ६ ट्रॉफी, ७ हजार धावा अन् हॅट्रिक... हिटमॅन रोहितच्या नावावर IPL मध्ये आहेत हे भन्नाट रेकॉर्ड्स

Purandar Airport: पुरंदर विमानतळ भूसंपादनासाठी एकरी दीड कोटी रुपये मोबदला; सहा महिन्यांत भूसंपादनाचे काम पूर्ण करणार!

SCROLL FOR NEXT