police Sakal
मुंबई

सेवानिवृत्त पोलिसांची आर्थिक कोंडी

मागील सहा वर्षांपासून सातव्या वेतन आयोगाने निवृत्ती वेतन मिळत नाही

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - ‘सरकारी काम, बारा महिने थांब’ या म्हणीचे प्रत्यंतर वारंवार सरकारी कार्यालयात दिसून येतो. आयुष्यातील ३० ते ३५ वर्षे पोलिस विभागात सेवा दिलेल्या सेवानिवृत्तांना मागील सहा वर्षांपासून सातव्या वेतन आयोगाने निवृत्ती वेतन मिळत नाही. विकलेलील्या रजेची रक्कम मिळत नाही, विकलेली पेन्शन रक्कम मिळत नाही, अशी व्यथा सेवानिवृत्त पोलिसांनी मांडली. गुरुवारी (ता. २८) प्रधान महालेखापाल व पोलिस आयुक्तांच्या वतीने नायगाव येथील पोलिस संकुल हॉल येथे ‘पेन्शन अदालत’ भरवली होती. मात्र पोलिस आयुक्तांची गैरहजेरी आणि समस्यांवर योग्य तोडगा मिळाला नसल्याने सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांचा हिरमोड झाला.

जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू झाला आहे. मात्र आयोगाप्रमाणे पेन्शन, अनेकांना सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे पेन्शन लागू नाही, विकलेल्या रजेची रक्कम मिळत नाही, विकलेली पेन्शन रक्कम मिळत नाही, ग्रॅज्युअटिची रक्कम मिळत नाही, अशा समस्येला सेवानिवृत्त पोलिसांना सामोरे जावे लागते. एका कर्माचाऱ्याचे वेतन मिळवकृताना निधन झाले, तसे इतरांचे व्हावे याची वाट पाहिली जाणार आहे का, असा प्रश्न मुंबईचे सेवानिवृत्त पोलिस संघटनेचे अध्यक्ष मोहन तोडकर यांनी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची अपडेट ! जानेवारी-फेब्रुवारीचा हप्ता एकत्रच मिळणार ? 'या' दिवशी खात्यात येऊ शकतात पैसे

Pune News: ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा उडणार! प्रभाग कार्यक्रम जाहीर; पुणे जिल्ह्यातील ८७३ ग्रामपंचायतींसाठी हालचाली

मुंबईत MMRDAचा जमीनविक्रीचा सपाटा, ४ वर्षात १० हजार कोटींचे भूखंड विकले; आणखी ११ हजार कोटींचे भूखंड विकणार

Top NIT Colleges In India: भारतातील टॉप NIT कॉलेजमध्ये प्रवेशासाठी किती टक्केवारी लागेल? पाहा संपूर्ण लिस्ट

Stock Market Today : शेअर बाजाराची सपाट पातळीवर सुरुवात! IT सेक्टरवर दबाव कायम; कोणते शेअर्स वाढले?

SCROLL FOR NEXT