Sunil Pal
Sunil Pal social media
मुंबई

डॉक्टरांबद्दलच्या वक्तव्यावरून कॉमेडियन सुनील पालविरोधात गुन्हा

अनिश पाटील - सकाळ वृत्तसेवा

मुंबई: डॉक्टरांविरोधात अपमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी कॉमेडियन सुनील पाल (Sunil Pal)विरोधात अंधेरी पोलिस ठाण्यात (andheri police station) गुन्हा (Fir) दाखल करण्यात आला आहे. कोविड काळात डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत असताना समाज माध्यमांवर डॉक्टरांबाबत केलेल्या टीप्पणीबद्दल सुनील विरोधात तक्रार करण्यात आली होती. डॉक्टरांच्या एका संघटनेने ही तक्रारकेली आहे. (Fir against comedian Sunil Pal in andheri police station)

असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट, मुंबई ही संघटना महाराष्ट्र व कर्नाटकातील 12 हजार डॉक्टर व 811 रुग्णालयांचे प्रतिनिधीत्त्व करते. संघटनेच्या अध्यक्षा डॉ. सुष्मिता भटनागर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पाल याने यू ट्यूब वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये डॉक्टरांबद्दल चुकीची टीप्पणी केली आहे. त्यामुळे डॉक्टरांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले आहे. तसेच कोविडच्या स्थितीत डॉक्टरांबद्दल अफवा पसरवण्याचे काम केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

यूट्यूबवर तो चांगलाच वायरल झाल्यानंतर व्हॉट्सअॅप व इतर प्लॅटफॉर्मवरही हा व्हिडीओ वायरल झाला होता. देशातील डॉक्टरांच्या विविध संघटनांनी त्यावर आक्षेप घेतला होता. त्यावेळी सुनील पालने माफी मागावी अशी मागणीही जोर धरत होती.

डॉक्टरांबाबत द्वेष निर्माण होईल, तसेच सामान्य नागरीकांमध्ये संभ्रम निर्माण होईल, अशी स्थिती सुनील पालच्या वक्तव्यामुळे निर्माण होऊ शकेल, त्यामुळे डॉक्टरांमध्ये नाराजी पसरली असल्याचे तक्रारीत भटनागर यांनी म्हटले आहे. 22 एप्रिलला याप्रकरणातील तक्रार डॉक्टर सुधीर नाईक यांनी अंधेरी पोलिसांकडे सुपूर्द केली होती. त्यानुसार पाल विरोधात भादंवि कलम 500, 505(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाल याने याप्रकरणी यापूर्वीच माफी मागितली आहे. दुस-या व्हिडिओमध्ये या टीप्पणी वाईट व्यक्तींबद्दल होत्या. आपले कर्तव्य बजावण-या डॉक्टरांबद्दल नव्हत्या, असे पालच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT